Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

How To Stop A Child From Eating Soil लहान मुलांची माती खाण्याची सवय शरीरासाठी अतिशय अपायकारक ठरु शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:39 PM2023-04-07T18:39:23+5:302023-04-07T18:40:22+5:30

How To Stop A Child From Eating Soil लहान मुलांची माती खाण्याची सवय शरीरासाठी अतिशय अपायकारक ठरु शकते.

How To Stop A Child From Eating Soil | लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

आपण लहान असताना माती हमखास खाल्ली असेल. पहिल्या पावसाची सर जेव्हा मातीवर पडते, तो गंध संपूर्ण घरात दरवळतो. आजही अनेकांना माती खाण्याची इच्छा होतेच. लहान मुलांना दिसेल ते तोंडात कोंबण्याची सवय असते. ते अधिक करून माती खाताना दिसतात. काही मुलांना गुपचूप माती, भिंतीची पापुद्रे, भिंतीचा रंग चाटणं किंवा खडू खाण्याची सवय असते.

पण हीच सवय शरीरात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. माती खाणे किंवा खाण्यासाठी योग्य नसलेल्या गोष्टींचं सेवन करणे, हा पिका रोगाचा एक प्रकार आहे. माती खाण्याच्या सवयीमागे अनेक कारणे असू शकतात. पण ही सवय वेळीच सोडणे गरजेचं आहे(How To Stop A Child From Eating Soil).

लहान मुलं माती का खातात?

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, लहान मुले तेव्हा माती खातात जेव्हा, शरीरात कॅल्शियम, झिंक आणि आयर्नची कमतरता भासते. मुलांचे शरीर पोषक तत्वांची मागणी करतात, त्यामुळे ते माती खाण्यास सुरुवात करतात. कुपोषित मुलेही माती खातात. मुलाला वयानुसार आहार मिळाला नाही तेव्हा ते माती खाण्यास सुरुवात करतात.

बाळ पलंगावरुन किंवा झोळीतून पडलं तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काय कराल?

माती खाणाऱ्या मुलांमध्ये दिसतात ही लक्षणे

माती खाणाऱ्या मुलांच्या शरीरात अशक्तपणा येतो. मूल थकतात व चिडचिडपणा करतात. माती खाल्ल्याने भूक लागत नाही. मुलांचे पाय दुखायला लागतात. पोट देखील साफ राहत नाही. यासह बाळाचे यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचाही धोका वाढतो.

लहान मुलं सतत नाकात बोट घालतात? हे नक्की कशाचे लक्षण, ही सवय कशी मोडायची

यासंदर्भात, उषा क्लिनिकचे एम.डी. बालरोगतज्ज्ञ डॉ. रविकांत निरंकारी सांगतात, ''बहुतांश मुलांना माती खाण्याची सवय असते. अधिक प्रमाणावर माती खाल्ल्याने, मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.''

मुलांमधील माती खाण्याची सवय कशी सोडाल

१. मुलं सतत माती खात असतील तर, त्यांना पोषक तत्वांनी समृद्ध आहार द्या. जेव्हा मुलांना आहारातून लोह, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि प्रथिने मिळतील, तेव्हा मुलांना माती खावीशी वाटणार नाही.

२. चांगल्या आहारामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुधारेल. मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला द्या. जेणेकरून आहारातून त्यांना लोह आणि पोषक तत्वे मिळतील. त्यांच्या आहारात एक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेऊ नका. अन्यथा मुलांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

३. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा. व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी हंगामी फळे खायला द्या.

४. आईवडिलांचं लहान बाळाकडे दुर्लक्ष होत असल्यास, त्यांना माती खाण्याची सवय लागू शकते. यावर उपाय म्हणून जास्तीत-जास्त वेळ मुलांसोबत राहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

Web Title: How To Stop A Child From Eating Soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.