Lokmat Sakhi >Parenting > मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

How To Take Care Of Your Child’s Mental Health : मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष द्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 09:55 AM2022-08-01T09:55:41+5:302022-08-01T10:00:06+5:30

How To Take Care Of Your Child’s Mental Health : मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष द्यायला हवे.

How To Take Care Of Your Child’s Mental Health : Children suddenly become irritable, do not listen; Remember 4 things to protect children's mentality... | मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

Highlightsत्यांचा दिवस कसा होता याविषयी त्यांना विचारा. त्यांनी दिवसभरात काय केले, तुम्ही काय केले याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. साफसफाई, स्वयंपाक यांसारख्या कामांना मदतनीस ठेवल्यास आपल्याला मुलांसोबत जास्त वेळ घालवता येऊ शकतो. 

आई-वडील हे मुलांसाठी सगळ्यात पहिले शिक्षक असतात. दिवसातील सर्वाधिक वेळ आई-वडीलांबरोबर घालवत असल्याने मुले त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत असतात. मुलांना आकार देण्यात आई-वडीलांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पण आजकाल बदलत्या जीवनशैलीत आईवडीलांचा वेळ मिळणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे मुलांसाठी अवघड झाले आहे. मुलांचे वय वाढते तशी त्यांची समज तर वाढतेच पण लहानसहान गोष्टीवरुन चिडचिड करणे, आई-वडीलांचे न ऐकणे अशा गोष्टींमध्येही वाढ होते. ऑफीसचे कामाचा ताण, घरातली जबाबदाऱ्या आणि इतर गोष्टी यांमुळे पालकांचीही मुलांवर चिडचिड होते. आपण सांगितलेले मुलांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर आवाज चढवून बोलणे, प्रसंगी हात उचलणे अशा गोष्टी घडतात. यामुळे मुले आणखीनच हट्टी होतात आणि परिस्थिती आणखी हाताबाहेर जाते. एकदा या गोष्टी सुरू झाल्या की संपूर्ण घराचेच संतुलन बिघडते. पण मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष देण्याची आणि बदल करण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. 

१. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये संतुलन राखा

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून वर्क फ्रॉम होम ही संकल्पना उदयाला आली आहे. त्यामुळे घरातून काम करणाऱ्यांचा वैयक्तिक आयुष्यावर आणि प्रोफेशनल गोष्टींवरही परिणाम होत आहे. मात्र जे ऑफीसला जातात त्यांनी ऑफीसच्या कामाच्या वेळी ऑफीस आणि घरात असताना १०० टक्के घर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. दिवसातील जास्तीत जास्त वेळ दोघांपैकी एक पालक मुलासोबत राहील अशी कामाची आणि नोकरीची व्यवस्था करावी. 

२. आजी-आजोबांशी कनेक्ट हवा

आपण आपल्या लहानपणी आजी-आजोबांच्या सानिध्यात वाढल्याने आपण नकळत अनेक चांगल्या गोष्टी शिकतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना आजी-आजोबांचे जास्तीत जास्त प्रेम मिळेल अशी व्यवस्था करा. त्यामुळे बऱ्याच गोष्टींत आपली काळजी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मुलांचे आणि आपल्या पालकांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. शक्य असल्यास घरात मदतनीस ठेवा

अनेकदा आपण सकाळी उठल्यापासून घरातील कामे करत असतो. यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आणि इतर गोष्टींमध्ये जातो. त्यामुळे आपले मुलांकडे दुर्लक्ष होते किंवा त्यांना आवश्यक तितका वेळ आपण देऊ शकत नाही. अशावेळी साफसफाई, स्वयंपाक यांसारख्या कामांना मदतनीस ठेवल्यास आपल्याला मुलांसोबत जास्त वेळ घालवता येऊ शकतो. 

४. मुलांसोबत क्लालिटी टाइम घालवा

आपण नोकरी करणे, इतर गोष्टी करणे हे सगळे ठिक असले तरी ज्यावेळी आपण घरात असतो, मुलांसोबत असतो त्यावेळी आपल्या मुलांसोबत क्वालिटी वेळ घालवणे अतिशय महत्त्वाचे असते. संध्याकाळी जेव्हा आपण कामावरुन घरी येतो आणि मुलांना भेटतो. तेव्हा त्यांचा दिवस कसा होता याविषयी त्यांना विचारा. त्यांनी दिवसभरात काय केले, तुम्ही काय केले याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. असे करणे त्यांच्या वाढीसाठी आणि तुमचे नाते बहरण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरु शकते. 

Web Title: How To Take Care Of Your Child’s Mental Health : Children suddenly become irritable, do not listen; Remember 4 things to protect children's mentality...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.