प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगलं इंग्रजी बोलावं. सध्याच्या काळात इंग्रजी भाषा ही फक्त आंतरराष्ट्रीय भाषाच नाही तर नेटवर्किंगसाठी उत्तम माध्यम आहे. (English Speaking Ideas) जेव्हा कोणतीही व्यक्ती हिंदीबरोबरच इंग्रजीत आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा निश्चितच त्या व्यक्तीची यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. (How To Teach Child To Speak English) काही पालकांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी कसं येणारा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. (How To Start Teaching Kids English At Home)
लहानपणापासूनच मुलांना इंग्रजी बोलण्यास प्रोत्साहन दिले तर ते मोठे झाल्यानंतरही इंग्रजी बोलतात. इंग्रजी शिकण्यासाठी अनेक पालक वेगळे ट्यूशन्ससुद्धा लावतात पण त्यांना मनासारखा रिजल्ट मिळत नाही. म्हणूनच काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं मूल लहानपणापासूनच चांगलं इंग्रजी बोलेल.
लर्नइंग्रजीकिड्सच्या रिपोर्टनुसार नवीन शब्द शिकवण्यासाठी आणि उच्चार सुधारण्यासाठी गाणी हा उत्तम उपाय आहे. कृतीसह गाणी विशेषत: लहान मुलांसाठी खूप उत्तम आहेत कारण ते गाण्यास सक्षम नसले तरी यात सहभागी होऊ शकतात. इंग्रजी कविता, गाणी ऐकवल्याने मुलांचे उच्चार स्पष्ट होतील. मुलं मौज मजा करत असताना खूप काही शिकतात.
शरीराला आतून पोखरते व्हिटामीन B-१२ ची कमी; ५ लक्षणं ओळखा-खा ५ पदार्थ, भरपूर व्हिटामीन मिळेल
फ्लॅशकार्ड्स हा शब्दसंग्रह शिकण्याचा आणि सुधारण्याचा १ उत्तम उपाय आहे. फ्लॅशकार्ड्सह तुम्ही अनेक गेम्स खेळू शकता. मेमेरी, किम्स गेम हॅपी फॅमिलीज. इत्यादी... याशिवाय लहानपणापासून मुलांचे बेसिक इंग्रजी ग्रामर क्लिअर असले तर पुढे अडथळे येत नाहीत.
सगळ्यात आधी घरातून ही भाषा शिकवा
जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलानं इंग्रजीत बोलावं तर स्वत: इंग्रजीत बोलायला शिका. तुम्ही जी बोलाल तीच भाषा मुलं आत्मसाद करतील आणि त्याच भाषेत उत्तर देतील. ती भाषा समजू लागतील.
मनी प्लांट धड वाढतच नाही-पानं कोमेजतात? 5 गोष्टी करा, भराभर वाढेल मनी प्लांट, वेलींनी बहरेल घर
इंग्रजी कार्टून, चित्रपट दाखवा
मुलं टिव्ही खूप पाहत असतील त्यांना इंग्रीज कार्टून किंवा इंग्रजी चित्रपट दाखवा. ज्यामुळे नवीन शब्द मुलांच्या कानांवर पडतील हळूहळू मुलं ती भाषा बोलू लागतील.
रात्री झोपताना १ काम करा
मुलांना रात्री झोपताना तुम्ही गोष्ट सांगत असाल तर इंग्रजीत ऐकवा. ही खूप उत्तम सवय आहे. ज्यामुळे मुलांची लर्निंग कपॅसिटी वाढते आणि मुलं विचारही तसाच करतात.