Lokmat Sakhi >Parenting > मुलं ऐकत नाही, उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचे वादच संपतील

मुलं ऐकत नाही, उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचे वादच संपतील

Five Ways to Teach Your Child Good Manners (Mulana shist kashi lavavi) : लहानपणापासून काही सवयी लावल्या तर मुलं मोठी झाल्यानंतर हट्टीपणा करत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:35 PM2023-12-13T12:35:47+5:302023-12-13T13:58:15+5:30

Five Ways to Teach Your Child Good Manners (Mulana shist kashi lavavi) : लहानपणापासून काही सवयी लावल्या तर मुलं मोठी झाल्यानंतर हट्टीपणा करत नाहीत.

How to Teach Good Manners And Values to your Child : Five Ways to Teach Your Child Good Manners | मुलं ऐकत नाही, उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचे वादच संपतील

मुलं ऐकत नाही, उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचे वादच संपतील

लहान मुलांना एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं तर ते मुद्दाम तिच गोष्ट करतात. (Parenting Tips in Marathi) नाईलाजाने पालकांना त्याच्यावर ओरडावे लागते तर काही मुलं मार खाल्लाशिवाय ऐकत नाही. तर काहीजण त्रास देण्याच्या बाबतीत इतके हट्टी असतात की मार खाल्ल्यानंतरही पुन्हा तीच गोष्ट करतात. मुलांना लहानपणापासून शिस्त  लावण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (How to Teach Good Manners And Values to your Child)

मुलांचे संगोपन आणि चांगले संस्कार देणं आई वडीलांची पहिली जबाबदारी असते.  लहानपणापासून काही सवयी लावल्या तर मुलं मोठी झाल्यानंतर हट्टीपणा करत नाहीत. (Five Ways to Teach Your Child Good Manners) आपल्या मुलांनी प्रगती करावी, आयुष्यात खूप जावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जर चांगले संस्कार असतील तर मुलं इतरांचा सन्मान करतात आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागतात. (Parenting Tips)

1) मुलं कसं बोलतात यापेक्षा काय बोलतात याकडे लक्ष द्या

लहान मुलांची बोलण्याची पद्धतच अशी असते की ते काहीही बोलल्ले तरी ऐकत राहावंस वाटतं. त्याचे बोबडे बोल मनाला आनंद देऊन जातात. पण मुलं घरातील किंवा बाहेरील कोणाचे अनुकरण करून जर अपशब्द वापरत असतील तर आई वडीलांनी वेळीच रोखायला हवं. बरेच पालक मुलांनी चुकीचा शब्द उच्चारल्यानंतर हसत राहतात. म्हणून मुलांना असं वाटतं की जे काही करत आहे ते योग्य आहे. असं न करता त्यांना योग्य पद्धतीने बोलायला शिकवा.

2) प्रत्येकाचा आदर करायला शिकवा

मुलांना चांगले संस्कार देताना मोठ्यांचा सन्मान करा असं शिकवलं जातं. त्याचबरोबर मुलांना लहानांचाही सन्मान करा असं सांगायला हवं. प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला हवा. याशिवाय कोणतचं काम लहान नसते. घरात काम करणारे नोकर असो किंवा भाजी वाले प्रत्येकाला समान दर्जा द्यायला हवा हे शिकवा.

ओटी पोट सुटलंय-पोटावर कपडे घट्ट बसतात? झोपण्याआधी ३ गोष्टी करा-झरझर घटेल वजन

3) त्यांची चूक समजावून सांगा

मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर सगळ्यात आधी त्यांना आपल्या चुकांचा स्वीकार करायला शिकवा. मुलांना नेहमी नम्रतेने वागण्याचा सल्ला द्या. मुलांना कोणत्याही गोष्टीवर सतत ओरडू नका. त्यांच्याकडून काय चुक झाली आहे  हे समजावून त्यांची चूक सुधारण्याचा चान्स द्या. 

केस गळतीने समोरच्या भागात टक्कल दिसतंय? हिवाळ्यात रोज हा १ लाडू खा-महिन्याभरात वाढतील केस

4) आपल्या वागण्यातून मुलं खूप काही शिकतात

मुलांना काहीही शिकवायचं असेल तर त्याची सुरूवात स्वत:पासून करा. जसं की मुलांना घर टापटिप ठेवावं, स्वच्छ राहावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वत:ला चांगल्या सवयी लावायला हव्यात. रोज २ वेळा ब्रश करा. जे पाहून मुलंही व्यवस्थित ब्रश करतील. घर टापटीप ठेवा, स्वत:च्या वस्तू स्वत: जागच्याजागी ठेवा.

5) सॉरी आणि थँक यू बोलायला शिकवा

अनेकजणांना थँक्यू बोलणं माहीत असते पण आपली चूक झाल्यानंतर सॉरी बोलायला आवडत नाही. सॉरी बोलल्यामुळे त्यांना अपमान झाल्याप्रमाणे वाटते. लहानपणापासूनच तुम्ही सॉरी आणि थँक्स बोलण्याची सवय लावली तर मुलं नम्रतेने यो दोन्ही शब्दांचा वापर करतील.

Web Title: How to Teach Good Manners And Values to your Child : Five Ways to Teach Your Child Good Manners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.