आई वडील होणं ही एक सुंदर अनुभूती आहे. पण आई-वडीलांना या दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. (Parenting Tips) आपल्या मुलाने एक उत्तम व्यक्ती बनावं असं प्रत्येक आईवडीलांना वाटतं. आपल्या मुलाचं सर्वत्र कौतुक व्हावं, मुलांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये, एकमेकांचा आदर करावा अशा साध्या अपेक्षा आई वडीलांच्या असतात. (Parenting Tips In Marathi) आपल्या मुलांनी कधीच चुकीच्या मार्गाला जाऊ नये असं आई वडीलांना वाटते. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मुलांना पालकांनी फार आधीच शिकवायला हव्यात त्याबद्दल समजून घेऊ. (How To Teach Manners To Children 6 Basic Manners To Teach Your Child)
मुलांना न चुकता या ६ गोष्टी शिकवा
१) मोठ्यांच्यामध्ये बोलू नका
मुलांना हे शिकवणं खूप गरजेचं आहे की २ मोठे व्यक्ती बोलत असतानामध्येच बोलू नये. मोठ्याने बोलून झाल्यानंतर आपलं म्हणणं मांडा. ज्यामुळे मुलांची ऐकण्याची क्षमता वाढेल आणि आपल्या गोष्टी, आपलं म्हणणं व्यवस्थित मांडू शकतील. चांगले बोलण्यासाठी आधी चांगले ऐकण्याची सवय असायला हवी.
२) परवानगीशिवाय कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका
मुलांनी लहानपणापासून हे शिकवणं गरजेचं आहे की विचारल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावू नका. कारण काही सवयी लहानपणी शिकवल्या तर नाही मोठेपणीही शक्य होत नाहीत. पर्सनल गोष्टी आणि लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाहीत. बॉन्ड्रीजचा रिस्पेक्ट करायला शिकतील आणि म्युच्युअल रिस्पेक्ट वॅल्यू करणं सुद्धा शिकतील.
पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन
३) वस्तू वापरून झाल्यानंतर जागच्याजागी ठेवा
मुलांना ही गोष्ट नक्की शिकवा की कोणत्याही वस्तूचा वापर केल्यानंतर ती वस्तू जागच्याजागी ठेवा. वापरल्यानंतर ती वस्तू त्याच जागेवर ठेवा जिथून ती उचलली होती. मुलांना लहानपणापासून वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावा. जेणेकरून नंतर शोधाशोध होत नाही.
कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी
४) शेअर करा
मुलांशी काही गोष्टी शेअर करायला हव्यात कारण शेअर करणं शिकल्यामुळे मुलांमध्ये सेंस ऑफ केअर आणि शेअरची भावना येईल. यासाठी मित्र, भावंडांबरोबर वस्तू किंवा खेळणी शेअर करण्याची सवय ठेवा. कारण शेअरिंग केअरींग जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत त्यांचं जीवन सोपं होणार नाही.
५) तुमचा टर्न येण्याची वाट पाहा
आपल्या मुलांमध्ये पेशंस डेव्हलप करायला शिका. त्यांना वारंवार आपल्या टर्नची वाट पाहायला हवा. खेळताना आपल्या मुलाचा चान्स येण्याची वाट पाहा. रांगेत उभं राहिल्यानंतर पुढच्या व्यक्तीचे काम झाल्यानंतर तुमचे काम होईल. याची खात्री करा आणि त्यानुसार वागा.
ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल
६) आदर करणं
आपल्या मुलांना नेहमी इतरांना मान द्यायला शिकवा. मुलांना लहानपणापासूनच मोठ्यांना मान देणं शिकवा. कारण जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा लोकांशी सॉफ्टली बोलतील.