मुलांचा अभ्यास घेणे हा आईवडिलांसाठी खूप मोठा टास्कच असतो. मुलांना अभ्यास शिकवताना त्यांच्या लिखाणापासून ते पाठांतरापर्यंत सगळंच पालकांना काळजीपूर्वक पहावं लागत. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना त्यांचं अक्षर देखील सुंदर आणि सुबक असावं असं प्रत्येक पालकांना वाटत. मुलांचे अक्षर चांगले यावे यासाठी पालक त्यांना पेन्सिल हातात कशी पकडावी इथपासून ते पुढे अनेक शिकवणी देतात. काही लहान मुलांना हातात पेन्सिल नीट धरुन लिहिता येत नाही, परिणामी त्यांचे अक्षर चांगले येत नाही. काहीवेळा मुलांना पेन्सिल हातात कशी धरावी हे समजत नाही, तर कधी काही अडचणी येतात. मुलं चुकीच्या पद्धतीने पेन्सिल धरतात(How to Teach Proper Pencil Grip to Kids).
पेन्सिलवर जर योग्य पकड असेल तरच अक्षर चांगले येते. मुलं कधी पेन्सिल फारच पुढे किंवा मागे धरतात यामुळे लिखाणात अडथळे येऊन अक्षर सुंदर येत नाही. मुलांची जर पेन्सिल योग्य पद्धतीने हातात पकडली तर अक्षर सुबक येण्यास मदत होते. मुलांची पेन्सिलवर योग्य पकड आणि उत्तम अक्षर यासाठी मुलांकडून पालकांनी काही अॅक्टिव्हिटी (3 easy activities to teach your youngster how to hold a pencil) करून घेतल्या तर मुलांना खरंच फायदा होईल. मुलांनी हातात पेन्सिल कशी (How To Correct a Poor Pencil Grip) पकडावी, त्यांचे अक्षर सुंदर येण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. आर.एस. बग्गा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुलांना पेन्सिल हातात धरण्याची योग्य ट्रिक समजण्यासाठी त्यांनी एक खास उपाय सांगितला आहे. हा उपाय नेमका काय आहे ते पाहूयात(An easy trick to teach your child pencil grip in 5 seconds).
मुलांची पेंन्सिल ग्रीप सुधारण्यासाठी करा ही सोपी ट्रिक...
बालरोगतज्ज्ञ डॉ. आर.एस. बग्गा यांनी मुलांची पेंन्सिल ग्रीप सुधारण्यासाठी क्ले म्हणजेच चिकणमातीच्या गोळ्याच्या एक खास उपाय सांगितला आहे. यासाठी तुम्हाला चिकणमातीचा किंवा कोणत्याही पिठाचा गोळा तयार करुन घ्यावा लागणार. हा गोलाकार तयार करून घेतलेला गोळा पेन्सिलच्या मागच्या भागात खोचून घ्या. आता या पेंन्सिलचा आकार एखाद्या लॉलीपॉप सारखा दिसेल. ही पेंन्सिल मुलांच्या हातात धरून त्यांचा लिहिण्याचा सराव घ्या. ही ट्रिक वापरल्याने नेमकं होत काय तर पेंन्सिल वजनाने जड होते, आणि त्यामुळे मुलांना पेंन्सिल हातात घट्ट धरावी लागते. या साध्यासोप्या अॅक्टिव्हिटीमुळे मुलांच्या बोटांचे स्नायू मजबूत होतात आणि त्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत होते.
झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?
मुलं अभ्यास का करत नाहीत? 'हे' कारणं आईबाबांनी समजून घेतलं तर प्रश्नच सुटेल कायमचा...
इतर उपाय काय करता येतील ?
१. लहानातील लहान आकाराच्या वस्तू बोटांनी उचलण्याचा सराव मुलांकडून करुन घ्या. जसे की, लहान मणी, तांदुळाचे दाणे अशा वस्तू मुलांना एक एक वेचून बोटांच्या मदतीने उचलायला लावा. असे केल्याने बोटांची पकड मजबूत होते.
२. सध्या बाजारांत अनेक प्रकारचे पेन्सिल ग्रिपर्स विकत मिळतात. जे मुलांना पेन्सिल व्यवस्थित धरण्यास मदत करतात. यासोबतच चित्र काढणे किंवा रंगवणे यामुळे देखील बोटांची पकड मजबूत होते यामुळे मुलं पेन्सिल व्यवस्थित धरू शकतात.
या छोट्या - छोट्या अॅक्टिव्हिटीजच्या मदतीने मुलांच्या बोटांची पकड सुधारेल आणि त्याचे हस्ताक्षर अधिक सुंदर व सुबक होण्यास मदत होईल.