Lokmat Sakhi >Parenting > मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

How To Teaching Children Life Skill Early :

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:51 PM2024-02-02T12:51:09+5:302024-02-02T13:48:47+5:30

How To Teaching Children Life Skill Early :

How To Teaching Children Life Skill Early : 5 Life Skills To Start Teaching Your Kids At an Early Age | मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

पालकत्व काही सोपं काम नाही. मुलांना चांगली शिस्त लावण्यात आयुष्य निघून जातं तरीही मुलांचे वागणं समाधानकारक वाटत नाही. (Parenting Tips)  पालकांसाठी आपली मुलं नेहमीच लहान राहतात. (5 Life Skills To Start Teaching Your Kids At an Early Age) वेळीच काही गोष्टी शिकवल्या जर आई-वडीलांवर दडपण येत नाही. मुलांना वेळीच चांगल्या गोष्टी शिकवायला हव्यात जेणेकरून वाढत्या वयात ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत. (How To Teaching Children Life Skill Early)

आपलं मूल २० वर्षांचे होण्याआधीच काही टिप्स शिकवल्या तर  त्यांना भविष्यात कोणत्याही समस्या येणार नाहीत. व्हेरी वेल फॅमिलीच्या रिपोर्टनुसार मुलांना लहान कमी वयातच स्वच्छतेच्या सवयी, टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, क्लिनिंग, टेबल मॅनर्स, स्वत:ची तयारी स्वत: करणं, घर  टाप-टीप आवरून ठेवणं  या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात.

एकटा प्रवास करण्याची सवय 

मुलांना कमी वयातच एकटं प्रवास करण्याची सवय लावा जेणेकरून मुलं थोडी धीट होतील आणि त्यांच्या मनात कसलीही भिती नसेल. विशिष्ट वयानंतर काही गोष्टी शिकवणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणून  २० वर्षांच्या वयात एकट्याने प्रवास करायला शिकवा. त्यांना हळूहळू जवळपास प्रवास करण्याचे ट्रेनिंग देत राहा.

सायकल किंवा बाईक चालवणं

 २० वर्षांच्या वयोगटात मुलांना बाईक-स्कूटी चालवायला शिकवा.  एक्सपर्ट्सच्यामते २० वर्ष वयोगटातील मुल गोष्टी  लवकर शिकतात. सगळ्यात आधी त्यांना सायकल चालवायला द्या नंतर तुम्ही स्कूटी किंवा बाईक चालवायला शिकवू शकता.

बालपणापासूनच कमालीचे हूशार असतात ६ सवयी असलेली मुलं; यशस्वी-बुद्धीमान होण्यासाठी खास टिप्स

कार ड्रायव्हिंग

गाडी चालवणं प्रत्येक मुलाने शिकायला हवं. २० वर्षांच्या वयात मुलांना चालायला शिकायला हवं. जेव्हा २० वर्ष वयोगटात मुलं असतात तेव्हा त्यांना कार चालवता यायला हवी.  नंतर ते  अधिक चांगली कार ड्राईव्ह करू शकतात.

पैसे मॅनेज करायला शिका

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पैसे कसे वापरता हे फार महत्वाचे असते. तुमचे मूल  २० वर्षांच्या होण्याआधीच त्याला पैसे वाचवायला शिकवा. जास्त उशीर करू नका कारण मुलांना पैसे वाया घालवण्याची सवय लागली तर  त्यांना हे स्किल शिकवणं कठीण असतं. मुलं मोठेपणीही आपल्या इच्छेनुसार कसेही पैसे खर्च करतात. म्हणून वेळीच पैश्याची बचत करायला शिकवा.

Web Title: How To Teaching Children Life Skill Early : 5 Life Skills To Start Teaching Your Kids At an Early Age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.