Join us  

मुलं सकाळी लवकर उठतच नाही? करा ४ सोप्या गोष्टी, मुलं उठतील हाक न मारता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 5:32 PM

How to Wake Up Kids in the Morning सकाळी मुलांना लवकर उठवून शाळेसाठी तयार करणं हे पालकांसाठी अवघड काम का होतं?

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं खूप मज्जा करतात, गावी जातात, उशिरा उठतात, धम्माल - मस्ती करतात. परंतु, शाळा सुरु झाल्यानंतर रुटीनला सुरुवात होते. मौज - मस्ती विसरून अभ्यासाला लागतात. सकाळ ते संध्याकाळ त्यांची प्रत्येक गोष्ट ही रुटीननुसार ठरलेली असते. जर सकाळी उठायला उशीर झाला तर, पुढील कामांमध्ये अडथळे निर्माण होतात.

काही मुलं सकाळी उठण्यास किरकिर करतात. ज्यामुळे अनेकदा शाळेत जाणे होत नाही. त्यांना कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते वेळेवर उठत नाही. अशा स्थितीत मुलाने वेळेत झोपावे वेळेत उठावे असे तुम्हाला वाटत असेल तर, या टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे मुलं सकाळी लवकर उठतील(How to Wake Up Kids in the Morning).

सकाळी मुलांना कसे उठवायचे?

समस्या समजून घ्या

हफपोस्‍ट या वेबसाईटनुसार, जर मुलाला सकाळी वेळेवर उठता येत नसेल तर, आधी त्याला उठण्यात अडचण का येत आहे याचे कारण शोधा. त्याला रात्री झोप येत नाही का? त्याची रात्रीची झोप पूर्ण होत नाही का? किंवा आणखी काही कारण आहे का? डॉक्टरांचा सल्ला घेऊन समस्या जाणून घ्या.

झोप पूर्ण होते की नाही

शाळेत जाणाऱ्या मुलांनी किमान १० तासांची झोप घ्यावी. रात्रीच्या वेळी मुलांना मोबाईल इत्यादीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. झोपण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा. जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल.

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

प्रेमाने उठवा

असे म्हणतात सकाळ चांगली झाली की दिवस चांगला जातो. सकाळी मुलांना उठवताना प्रेमाने उठवा. प्रेमाने त्यांचे नाव घेऊन उठवा, प्रेमाची भाषा मुलं लगेच समजतात. त्यांना सकाळी चांगल्या गोष्टी सांगा. त्यांना शाळेत जाण्याचं महत्व पटवून द्या.

मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील

स्वादिष्ट - आवडते पदार्थ बनवा

सकाळी टिफिन व नाश्त्यामध्ये मुलांच्या आवडीचा पदार्थ करून द्या. यामुळे मुलं चटकन उठून तयार होतील, व आपल्या आवडीचा नाश्ताही फस्त करतील. 

टॅग्स :पालकत्वशाळा