Lokmat Sakhi >Parenting > तुमची मुलंही सतत युट्यूब पाहतात? मुलांच्या विकासासाठी ते घातक, कारण...

तुमची मुलंही सतत युट्यूब पाहतात? मुलांच्या विकासासाठी ते घातक, कारण...

How You Tube Can Be Dangerous to your Child : काही वेळा मुलं आपल्या नकळत स्क्रोलिंग करतात, जे त्यांच्यासाठी घातक असू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 09:50 AM2023-04-05T09:50:39+5:302023-04-05T09:55:01+5:30

How You Tube Can Be Dangerous to your Child : काही वेळा मुलं आपल्या नकळत स्क्रोलिंग करतात, जे त्यांच्यासाठी घातक असू शकते.

How You Tube Can Be Dangerous to your Child : Do your kids watch YouTube all the time? It is dangerous for children's development because... | तुमची मुलंही सतत युट्यूब पाहतात? मुलांच्या विकासासाठी ते घातक, कारण...

तुमची मुलंही सतत युट्यूब पाहतात? मुलांच्या विकासासाठी ते घातक, कारण...

मोबाइल हा सध्या सर्वच वयोगटातील लोकांसाठी गळ्यातील ताईत बनला आहे. थोडा वेळ हातात मोबाइल नसेल तर अनेकांना अस्वस्थ झाल्यासारखे होते. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. मोठ्यांच्याच हातात सतत मोबाइल असल्याने लहान मुलांनाही कमी वयापासूनच या मोबाइलचे आकर्षण असते. कधी गाणी बघण्याच्या नादाने तर कधी आई-वडीलांच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहात मुलं मोबाइलचा वापर करतात. काही वेळा आपल्याला थोडा मोकळा वेळ मिळावा किंवा मुलांना चांगले काहीतरी शिकायला मिळावे या उद्देशाने युट्यूब लावून देतो. आपण त्यांना गाणी किंवा गोष्टींचे व्हिडिओ, काही माहितीपर व्हिडिओ दाखवतो. पण काही वेळा मुलं आपल्या नकळत स्क्रोलिंग करतात आणि त्यात त्यांच्यासाठी धोक्याचे असलेले व्हिडिओ त्यांच्यासमोर येतात (How You Tube Can Be Dangerous to your Child). 

युट्यूबवर असे अनेक व्हिडिओ क्रिएटर असतात जे नेटीझन्सना विशेषत: लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठीचे धोकादायक व्हिडिओ निर्माण करत असतात. यु ट्यूबवर जगभरातील असंख्य विषयांतील व्हिडिओ मिनीटा मिनीटाला अपलोड होत असतात आणि जगात कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण ते पाहू शकतो. पण लहान मुलांनी यु ट्यूबवर काय पाहावे आणि काय पाहू नये यावर पालक म्हणून आपले नियंत्रण असायला हवे. मात्र काही वेळा आपण मुलांना मोबाइल लावून देतो आणि आपले काम करायला लागतो. अशावेळी मुलांनी मोबाइल स्क्रोल केला तर काही घातक व्हिडिओ त्यांच्यासमोर येतात आणि ते पाहिल्याने मुलांचे नुकसान होऊ शकते. हे व्हिडिओ मुलांसाठी का घातक असतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समुपदेशक सांगतात, त्या कोणती पाहूया...

नेमकं काय होतं?

१. यु ट्यूबचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे आपण ज्या प्रकारचे व्हिडिओ पाहतो तो चॉईस लक्षात घेऊन त्याच पद्धतीचे व्हिडिओ यु ट्यूब आपल्याला दाखवत राहते आणि मुलं स्क्रोलिंग करुन आपल्याला हवे ते व्हिडिओ निवडू शकतात. 

२. आपले मूल आपण लावून दिलेले कार्टून पाहत आहे असा पालकांचा अनेकदा समज होतो. पण युट्यूबवर सेक्स, आत्महत्या किंवा खून अशी हिंसक प्रकारची अशी काही कार्टून्स क्रिएट केलेली असतात की कार्टूनच्या नावाखाली हे व्हिडिओ मुलांसमोर येऊ शकतात. 

मुलांसमोर चुकीचं काही येऊ नये म्हणून काय करायला हवं...

१. मुलांसमोर अनावश्यक गोष्टी येऊ नयेत यासाठी युट्यूब कीडस अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. 

२. युट्यूबवर येणारा कंटेंट मॅन्युअली अप्रूव्ह करा. म्हणजे मुलांसमोर त्यांना पाहता येईल असाच कंटेंट येईल आणि यामुळे आपले मूल नको त्या कंटेंटपासून सुरक्षित राहील. 

Web Title: How You Tube Can Be Dangerous to your Child : Do your kids watch YouTube all the time? It is dangerous for children's development because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.