अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजैन खान यांचा मोठा मुलगा रेहान १७ वर्षांचा असून त्याला संगीत क्षेत्राची अतिशय आवड आहे (Hrithik Roshan and Sussanne Khan's Son Hrehaan). पणजोबा तसेच ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांचा संगीत वारसा तो पुढे चालवू शकतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्याने असंच घवघवीत यश नुकतंच मिळवलं असून या यशाने आई सुजैन खान अतिशय आनंदात आहे. रेहानला Berklee College of Music यांच्याकडून नुकतंच scholarship merit award मिळालं आहे. (Sussanne Khan's viral post on instagram)
याविषयीची एक छानशी पोस्ट सुझैनने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली असून त्यामध्ये रेहानचा लहानपणापासूनचे फोटो असणारा एक छोटासा व्हिडिओही टाकला आहे.
रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....."
यामध्ये सुजैनने लिहिले आहे की तिचा बेस्ट फ्रेंड असणाऱ्या रेहानला स्कॉलरशिप मिळणं हा तिच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. संगीत हे रेहानचं पॅशन असून मागच्या ९ वर्षांपासून रेहान त्याच्यासाठी खूप मेहनत घेत आहे. I am so so proud of you my Son you fill me up with the brightest light.. I know you never gonna ‘Stop this Train अशा शब्दांत तिने तिचा आनंद व्यक्त केला...
सुजैन आणि ह्रतिक यांचा प्रेमविवाह २००० साली झाला. २००६ साली रेहानचा तर २००८ साली रिधानचा जन्म झाला.
सद्गुरू सांगतात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी महिलांनी 'हे' धान्य नेहमीच खावं... हाडं होतील मजबूत
यानंतर २०१४ यावर्षी ह्रतिक आणि सुजैन दोघेही वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. सुजैनची ही पोस्ट पाहून आजोबा राकेश रोशन, आत्या पश्मिना रोशन यांच्यासह करिश्मा कपूर, रितेश देशमूख यांच्याप्रमाणेच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी रेहानचे आणि सुजैनचे अभिनंदन केले आहे.