मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, मुलांचं पोट भरलं असेल का, मुलं उपाशी तर नसतील ना... असे कित्येक प्रश्न मुलांच्या खाण्याच्या बाबतीत बहुसंख्य आईंना पडलेले असतात. त्यात सर्वाधिक महिलांना हा प्रश्न पडतो की मुलांना शाळेत जाण्यापुर्वी काय खाऊ घालावं. कारण सकाळच्या वेळी मुलांना खूप भूक नसते. त्यामुळे थोडंसंच काहीतरी द्यावं लागतं पण त्यामुळे भूक भागली जाईल ना, मधल्या सुटीपर्यंत ते थांबू शकतील ना, याचाही विचार करावा लागतो (ideal breakfast for kids before going to school). त्यामुळेच हे काही पर्याय पाहा.. तुम्हाला रोजच्या धावपळीत नक्कीच त्याचा उपयोग होईल... (3 best breakfast options for kids)
मुलांना शाळेत जाण्यापुर्वी कोणते पदार्थ खाऊ घालावे?
ज्या पदार्थांमधून प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट उत्तम प्रमाणात मिळतील असे पदार्थ तुम्ही मुलांना शाळेत जाण्यापुर्वी खायला देऊ शकता. असे पदार्थ खाल्ल्याने पोट व्यवस्थित भरते. त्यामुळे मुलांचे अभ्यासातही चांगले लक्ष लागते.
डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवून बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं वेळीच ओळखा
१. वरण भात
काही मुलं ८ वाजेच्या आसपास घराबाहेर पडतात आणि थेट ३- ४ वाजेच्या सुमारास घरी येतात. त्यामुळे त्यांना गरमागरम वरणभात मिळत नाही. त्यामुळे शक्य झाल्यास मुलांना वरण- भात साजूक तूप टाकून खायला द्या. वरणातून प्रोटीन्स मिळतात आणि भातातून एनर्जी. मुलांच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
२. दूध आणि सुकामेवा
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की शाळेत जाण्यापुर्वी मुलांना १ ग्लास दूध आणि त्यासोबत मुठभर सुकामेवा खायला द्या. हा त्यांच्यासाठी एक उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो. सुकामेवा नसल्यास शेंगदाणे, फुटाणे, लाह्या हे पदार्थही देऊ शकता.
३. पारंपरिक पदार्थ
तुम्हाला शक्य झालं तर पोहे, उपमा, इडली, डोसा, उत्तपा, पराठा, दलिया, धिरडे, थालिपीठ असे आपले पारंपरिक पदार्थही मुलांना देऊ शकता.
फरहान अख्तर सांगतो पालकांच्या घटस्फोटामुळे होणारे परिणाम मी भोगले, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....
हे पदार्थ करण्याइतका आणि ते खाण्याएवढा वेळ तुमच्याकडे आणि मुलांकडे असेल तर या पारंपरिक पदार्थांना प्राधान्य द्या, असंही त्यांनी सुचवलं आहे.