मुलांनी शहाण्यासारखं वागावं, सगळ्यांसमोर आपल्याशी नीट बोलावं अशी आपली किमान अपेक्षा असते. पण अनेकदा मुलं आपण त्यांना काहीही सांगितलं की उलटं बोलतात. लोकांसमोर मुलं अशी वागली की आपल्याला खूप लाज वाटते आणि मेल्याहून मेल्यासारखं होतं. आपण मुलांवर हेच संस्कार केले का, मुलांना शिस्तच नाही असं लोकांना वाटेल यामुळे आपली अवस्था अशी होते. आपण मुलांना नेहमीच शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो पण तरीही मुलं आपल्या हाताबाहेर जातात आणि अगदी ३-४ वर्षाच्या लहान वयातही आपल्याला विनाकारण उलटं बोलतात (if Your Child is Back Answering you then do only 2 things Parenting Tips).
असं करणं अतिशय सामान्य आहे असा मुलांचा समज असतो. मात्र ही सवय वेळीच खोडून काढली नाही तर ती तशीच राहते आणि भविष्यात वाढत जाते. पण म्हणून मुलांना ओरडून किंवा मारुन, शिक्षा करुन उपयोग नसतो. तर पालक म्हणून आपणच आपल्या वागण्यात थोडा बदल केला तर त्याने ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते. आता मुलांनी असं करु नये आणि नीट वागावं यासाठी नेमकं काय करायचं याबाबत समुपदेशक प्रिती काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात त्या कोणत्या पाहूया...
१. मुलं मोठी होत असल्याचं लक्षण
मुलं अनेकदा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आता मी मोठी किंवा मोठा होतोय. त्यामुळे आता काही लहान लहान निर्णय हे माझे मला घेऊदे. अशावेळी आपण थोडं थाबायला हवं किंवा २ पावलं मागे यायला हवं. म्हणजे मुलं त्यांचे निर्णय स्वत:चे स्वत: घेऊ शकतील. त्यांचे जे निर्णय चुकतील तेव्हा त्यांना कळेल. पण जर त्यांनी घेतलेला छोट्यातला छोटा निर्णय जरी बरोबर ठरला तर त्यांचा आत्मविश्वास आणि आत्म सन्मान नक्कीच वाढण्यास मदत होईल.
२. पालक आणि मुलांमधील कनेक्शन तपासा
मुलं आपल्याला वारंवार उलटं बोलत असतील तर तुमचं आणि त्यांचं कनेक्शन चांगलं नाही हे लक्षात घ्या. आपलं मुलांसोबतचं कनेक्शन विक होत आहे हे वेळीच ओळखा आणि त्यासाठी योग्य त्या स्टेप्स घ्या. यासाठी मुलांना सतत सल्ले देणं, गाईड करणं आणि करेक्ट करणं बंद करा. यापेक्षा मुलांशी मज्जा मस्ती करा, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या. त्यांना एखाद्या चित्रपटाबद्दल, खेळाबद्दल सांगा. त्यामुळे नकळत तुम्हाला मुलांमध्ये फरक दिसण्यास मदत होईल.