Join us  

मुलं बराच वेळ एकटीच, हवं तसं खेळतात? तज्ज्ञ सांगतात फ्री प्ले गरजेचाच, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 4:19 PM

Importance of Free or Unstructured Play Parenting Tips : मुलांचे संगोपन होण्यात अशाप्रकारचा फ्री प्ले अतिशय महत्त्वाचा असतो.

ठळक मुद्देदिवसातला ठराविक वेळ मुलांना फ्री प्लेसाठी आवर्जून राखून ठेवायला हवाते खेळण्यांशी वेगवेगळे प्रयोग करुन पाहतात आणि त्यातून त्यांच्या क्षमता सुधारण्यास मदत होते.

लहान मुलांना सतत व्यस्त ठेवणं एक महत्त्वाचं काम असतं. ते शाळेत असतात आणि झोपलेले असतात तेव्हाच आपल्याला काय ती शांतता असते. नाहीतर बाकीचा पूर्ण वेळ त्यांना सतत काही ना काही करायचं असतं. मुलं एंगेज असलेली चांगली म्हणून आपण त्यांना काही वेळा छंदाचे किंवा खेळाचे क्लास लावतो. आपण अनेकदा मुलांचे दिवसभराचे शेड्यूल आखतो. सकाळी उठल्यापासून त्यांनी काय करायला हवं, कशा पद्धतीने करायला हवं हे आपण त्यांना शिकवतो. बऱ्याचदा मुलांना त्यांच्या पद्धतीने मोकळेपणाने खेळायचं असतं. पण त्यांनी अमुक एक खेळणं अमुक पद्धतीनेच खेळायला हवं, खेळतानाही सगळं शिस्तीत, विशिष्ट पद्धतीने करायला हवं अशी आपली अपेक्षा असते (Importance of Free or Unstructured Play Parenting Tips). 

मात्र बरेचदा मुलांना त्यांच्या पद्धतीने मोकळेपणाने खेळायचे असते. यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना नको असतात. अनेकदा त्यांना कोणाचीही सोबतही नको असते. खेळण्यांशी किंवा घरात इतर कोणत्या वस्तूंशी ते एकटे आपल्या पद्धतीने खेळत असतील तर त्यांना तसे खेळू द्यायला हवे. यालाच फ्री प्ले असे म्हटले जाते, मुलांचे संगोपन होण्यात अशाप्रकारचा फ्री प्ले अतिशय महत्त्वाचा असतो. कारण यामुळे मुलांची आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, निर्णय क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी मुलं खेळत असतील तर त्याकडे लक्ष द्यायला हवं, पण सतत सूचना दिल्या किंवा मदत केली तर तुम्ही मुलांना शारीरिक, मानसिकरित्या कणखर होण्यापासून रोखता हे वेळीच लक्षात घ्या. 

१. मुलं खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष द्या, पण खेळणी कशी खेळायची, पझल्स कशी सोडवायची हे त्यांना सतत सांगू नका.

२. मुलांनी कायम सगळं परफेक्टली खेळलं पाहीजे अशी पालक म्हणून आपली अपेक्षा असते. मात्र यामुळे आपण त्यांच्या विकासामध्ये अडथळा होतो हे आपल्याला लक्षात येत नाही. 

३. मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी स्वत: शिकणे, एक्सप्लोअर करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्यातील विविध क्षमता वाढण्यास मदत होणार असते. हे पालक म्हणून आपण लक्षात घ्यायला हवं. 

४. त्यामुळे मुलांना एंगेज करत असताना त्यांना फ्री प्लेसाठी दिवसभरात थोडा तरी वेळ मिळेल याची काळजी आपण घ्यायला हवी. यामुळे ते खेळण्यांशी वेगवेगळे प्रयोग करुन पाहतात आणि त्यातून त्यांच्या क्षमता सुधारण्यास मदत होते.   

टॅग्स :पालकत्वलहान मुलं