Lokmat Sakhi >Parenting > लेकरांसाठी वाट्टेल ते! रोज ६५० किलोमीटर लांब ऑफिसला जाणाऱ्या आईची गोष्ट व्हायरल, पण बाकीच्यांचं काय?

लेकरांसाठी वाट्टेल ते! रोज ६५० किलोमीटर लांब ऑफिसला जाणाऱ्या आईची गोष्ट व्हायरल, पण बाकीच्यांचं काय?

Indian-origin woman: Racheal Kaur: Indian-Origin Woman Flies From Penang To Kuala Lumpur : Managing a strict schedule: Support from AirAsia and the value of office work: Finding moments of peace in the sky: Social media viral Interview: woman dream job: मुलांना रोज पाहाता यावं म्हणून आई रोज करते मलेशिया ते सिंगापूरचा प्रवास, अपडाऊन करणाऱ्या अनेक महिलांची गोष्टही अशीच असते, पण त्यांना विचारतो कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 17:38 IST2025-02-12T17:36:44+5:302025-02-12T17:38:12+5:30

Indian-origin woman: Racheal Kaur: Indian-Origin Woman Flies From Penang To Kuala Lumpur : Managing a strict schedule: Support from AirAsia and the value of office work: Finding moments of peace in the sky: Social media viral Interview: woman dream job: मुलांना रोज पाहाता यावं म्हणून आई रोज करते मलेशिया ते सिंगापूरचा प्रवास, अपडाऊन करणाऱ्या अनेक महिलांची गोष्टही अशीच असते, पण त्यांना विचारतो कोण?

Indian-origin women stay in Malaysia takes a flight to Daily Work 650 kilometers for Singapore people called super traveller | लेकरांसाठी वाट्टेल ते! रोज ६५० किलोमीटर लांब ऑफिसला जाणाऱ्या आईची गोष्ट व्हायरल, पण बाकीच्यांचं काय?

लेकरांसाठी वाट्टेल ते! रोज ६५० किलोमीटर लांब ऑफिसला जाणाऱ्या आईची गोष्ट व्हायरल, पण बाकीच्यांचं काय?

मुलांवर सगळ्यात जास्त प्रेम कुणाचे असेल तर ते आईच. तिची माया, तिच्या ममतेला कोणत्या पैशात कधीच तोलता येणारं नाही. ती आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. मुलांच्या जबाबदारीत, त्यांच्या संगोपनात तिचं उभ आयुष्य ती पणाला लावते. मुलं कितीही मोठी झाली तरी तिची काळजी आणि जबाबदारी संपत नाही. सध्या अशीच एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 
भारतीय वशांची असणाऱ्या या महिलेने स्वत:चे स्वप्न जगत मुलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी प्रयत्न करते आहे.(Indian-origin woman Racheal Kaur) आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी दररोज घर ते ऑफिसचा प्रवास विमानाने करतेय. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसलाय ना... पण रोज घर आणि ऑफिस सांभाळणं प्रत्येक महिलेसाठी अवघड काम आहे. (Woman Flies From Penang To Kuala Lumpur) त्यात घरी लहान मुले असतील तर अक्षरश: तारेवरची कसरतच असते.

मलेशियात राहणाऱ्या  या भारतीय वशांच्या आईला लोक 'सुपर ट्रॅव्हलर' म्हणून ओळखत आहेत. रोज पहाटे ४ ला उठून सर्व तयारी करते. ज्याप्रमाणे ती घर आणि ऑफिस सांभाळते आहे हे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.(Malaysia takes a flight to Daily Work at Singapore) सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या महिलेचे नाव आहे राहेल कौर. ती एअर एशियाच्या फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजजर आहे. आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला जाण्यासाठी चक्क मलेशिया ते सिंगापूर असा रोजचा विमान प्रवास करते. मिळालेल्या माहितीनुसार तिची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होतेय. काम आणि कुटुंबाचे संतुलन राखताना तिला जे सोईचे वाटते त्याप्रमाणे ती ते करते. तसेच मला आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला मिळतो, याचा जास्त आनंद होतो असे तिने म्हटले आहे. 

साधारण ३ तासांचा विमान प्रवास ती रोज करते. खरंतर ही स्टोरी व्हायरल झालेली असली तरी रोज तीन तीन तास प्रवास लोकलच्या गर्दीत कोंबून आणि एसटीत उभ्यानं अनेकजणी करतात. पहाटे उठून सगळा स्वयंपाक, घरचं आवरुन ऑफिस गाठतात. मुंबई पुणे, मुंबई नाशिक अपडाऊन करणाऱ्या अनेकींची अशीच गोष्ट असते. एवढंच कशाला मुंबई पुणे बंगळूरु सारख्या शहरात रोज ट्राफिक जाममध्ये अडकून अनेकजणी दोन अडीच तास एकमार्गी प्रवास सहज करतात.
या कष्टांना ग्लॅमर नसतं आणि त्यांची व्हायरल चर्चा होत नाही इतकेच.

जसं की, राहेल कौर म्हणतात मला दोन मुलं आहेत. १२ वर्षांची मुलगी आणि धाकटी ११ वर्षांची आहे. मुलं मोठी जरी होत असली तरी आई म्हणून त्यांच्या आजूबाजूला मी असायला हवं असं मला सारखं वाटतं. मला रोज घरी जाऊन त्यांना पाहता येतं. तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो याचा आनंद होतो. त्या म्हणतात की, यापूर्वी त्यांनी क्वालालंपूरमधील ऑफिसजवळ घर घेतले होते. जे खूप महाग होतं. या काळात त्या फक्त आठवड्यातून एकदाच घरी जातं असे. ज्यामुळे कामावर आणि वैयक्तिक आयु्ष्यावर परिणाम होत होता. २०२४ च्या सुरुवातीला विमान प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मला घर आणि ऑफिस याचे योग्य संतुलन राखता आले. 


आउलटेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या की, दररोज सकाळी ४ वाजता कामाच्या तयारीसाठी उठते. ५ वाजून ५५ मिनिटांची फ्लाइट पकडण्यासाठी ५ वाजता विमानतळावर पोहोचते. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांला ऑफिसमध्ये पोहोचते. त्यानंतर रात्री ८ वाजता मी घर गाठते. तिने म्हटलं की, ऑफिसजवळ भाड्याने राहाण्यापेक्षा मी तितकेच पैसे प्रवास आणि खाण्यापिण्यावर खर्च करते. तसेच या प्रवासात माझ्या पैशांची देखील बचत होते. तिने सांगितले की, पूर्वी माझे महिन्याला $४७४ (सुमारे ₹ ४२,०००) खर्च व्हायचे , पण आता तिचा खर्च $३१६ (सुमारे ₹ २८,०००) प्रति महिना इतका कमी झाला आहे.

अशी कहाणी अनेक महिलांची असते, आईपण सोपं नसतंच त्यांच्यासाठी.. आणि करिअर करणंही!

Web Title: Indian-origin women stay in Malaysia takes a flight to Daily Work 650 kilometers for Singapore people called super traveller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.