Lokmat Sakhi >Parenting > गरोदरपणात ‘या’ २ गोष्टींपासून लांब राहा, बी. के. शिवानी सांगतात मनस्वास्थ्याचा मंत्र

गरोदरपणात ‘या’ २ गोष्टींपासून लांब राहा, बी. के. शिवानी सांगतात मनस्वास्थ्याचा मंत्र

BK Sister Shivani Gives Importance Advice To Pregnant Women : सोशल मीडियावरही अत्यंत कमी वेळ एक्टिव्ह असायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:11 PM2024-03-05T17:11:49+5:302024-03-05T18:24:59+5:30

BK Sister Shivani Gives Importance Advice To Pregnant Women : सोशल मीडियावरही अत्यंत कमी वेळ एक्टिव्ह असायला हवं.

Inspiration Talk By BK Sister Shivani Gives Importance Advice To Pregnant Women | गरोदरपणात ‘या’ २ गोष्टींपासून लांब राहा, बी. के. शिवानी सांगतात मनस्वास्थ्याचा मंत्र

गरोदरपणात ‘या’ २ गोष्टींपासून लांब राहा, बी. के. शिवानी सांगतात मनस्वास्थ्याचा मंत्र

प्रेग्नंसी एक अत्यंत नाजूक आरोग्याची स्थिती असते ज्यात महिलेला आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचीही काळजी घ्यावी  लागते. (Parenting Tips) छोट्यात छोटी चुकसुद्धा मुलांसाठी महगात पडू शकते.  गरोदरपणात महिलांनी काय करावे, काय करू नये यासाठी बरेचजण सल्ले देत असतात.  गरोदरपणात बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Spiritual Speaker BK Shivani Gives Important Advice To Pregnant Women)

मोटिव्हेशनल स्पिकर बी. के शिवानी यांनी गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गरोदर महिलांनी मोबाईलचा वापर करू नये. सोशल मीडियावरही अत्यंत कमी वेळ एक्टिव्ह असायला हवं. त्यातल्या नकारात्मक गोष्टींपासून दूर रहायला हवं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्य या व्हिडिओमध्ये बी. के शिवानी आपलं मत मांडतात.(BK Sister Shivani Gives Importance Advice To Pregnant Women) 

दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम

मोबाईल, सोशल मीडिया आणि गॅजेट्सपासून दूर  राहिलं तर त्यातल्या नकारात्मकतेपासून गर्भवती माता आणि मूलही सुरक्षित राहू शकेल. गर्भशयात असतानाच मुलांवर चांगले संस्कार द्यायला हवेत. आई जर प्रत्येकवेळी फोन, सोशल मीडिया किंवा टीव्ही पाहत असेल तर ते योग्य नाही. तो वेळ सकारात्मक गोष्टींसाठी द्यावा.

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

मूल जन्माला आल्यानंतर त्याला या गोष्टींबाबत जास्त क्रेझ वाटू शकतो. म्हणूनच गर्भवती महिलांना गॅझेट्सपासून लांब  राहण्याचा सल्ला दिला जातो.  गर्भावस्थेत फोन आणि टिव्हीला चिकटून राहिल्यामुळे मुलं गॅजेट्सशिवाय राहू शकत नाही. गर्भावस्थेत काही चुका टाळल्यास बाळाचेही आरोग्य चांगले राहील.

गर्भावस्थेत स्वत:कडे  लक्ष द्या

शिवानी सांगतात मुलांवर गर्भावस्थेतच चांगले संस्कार झाले तर मुलं मोठेपणी चांगले वागतील. प्रेग्नंसीत चुकीच्या सवयी स्वत:ला लावू नका. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. मुलांना संस्कार देण्याचे ३ टप्पे असतात.

पहिला चरण गर्भ संस्कर, दुसरा चरण आई वडिलांकडून मिळालेले संस्कार आणि तिसरं म्हणजे वातावरणातून मिळालेले संस्कार. मन शांत ठेवण्यासाठी  संगीत ऐका, ध्यान करा ज्यामुळे आई आणि मुलं दोघांनाही फायदा होतो. 

Web Title: Inspiration Talk By BK Sister Shivani Gives Importance Advice To Pregnant Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.