Lokmat Sakhi >Parenting > मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी ४ गोष्टी करा, वाचनात रमतील- भरपूर पुस्तकं वाचतील

मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी ४ गोष्टी करा, वाचनात रमतील- भरपूर पुस्तकं वाचतील

How To Develop Reading Habits In Kids: मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी पालकांनी काही गोष्टी आवर्जून कराव्या, जेणेकरून मुलांवर आपोआपच वाचनाचे संस्कार होत जातील..(interesting ways to introduce reading habit to your child)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 12:17 PM2024-08-21T12:17:01+5:302024-08-21T12:18:00+5:30

How To Develop Reading Habits In Kids: मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी पालकांनी काही गोष्टी आवर्जून कराव्या, जेणेकरून मुलांवर आपोआपच वाचनाचे संस्कार होत जातील..(interesting ways to introduce reading habit to your child)

interesting ways to introduce reading habit to your child, how to develop reading habits in kids | मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी ४ गोष्टी करा, वाचनात रमतील- भरपूर पुस्तकं वाचतील

मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी ४ गोष्टी करा, वाचनात रमतील- भरपूर पुस्तकं वाचतील

Highlightsतुमच्या शहरात एखादं पुस्तकांचं मोठं दुकान असेलच. त्या दुकानात एकदा मुलांना घेऊन जा.

काही अपवाद सोडले तर हल्लीची मुलं अजिबात अवांतर वाचन करताना दिसत नाहीत. कारण त्यांचा अधिकाधिक वेळ मोबाईल, टीव्ही पाहण्यात जातो. अगदी उन्हाळी सुटीत, दिवाळी सुटीतही मुलं वाचन करताना दिसत नाहीत. जे वाचनप्रेमी आई- बाबा किंवा आजी- आजोबा आहेत, त्यांना मुलांचा पुस्तकांच्या बाबतीत असणारा हा रुक्षपणा खुपतो. म्हणूनच तुमच्या मुलांनीही अवांतर वाचन करावं, त्यांना पुस्तकांची गोडी लागावी यासाठी या काही गोष्टी करून पाहा..(how to develop reading habits in kids) यामुळे आपोआपच मुलांच्या मनात पुस्तकांबाबत आकर्षण निर्माण होईल आणि ते अवांतर वाचन करू लागतील..(interesting ways to introduce reading habit to your child)

मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी काय करावं?

 

१. मुलांसमोर बसून वाचा

पालक जे करतात, तेच त्यांची मुलं करतात. बऱ्याच गोष्टींमध्ये मुलं पालकांचं अनुकरण करत असतात.

मुलं अजिबात ऐकत नाहीत-हट्टीपणा करतात? एक्सपर्ट सांगतात १ उपाय- मुलं ऐकतील- गुणी होतील

त्यामुळे आठवड्यातून एकदा सुटीच्या दिवशी किंवा मग रोज रात्री झोपण्यापुर्वी तुम्हीदेखील एखादं पुस्तक घेऊन मुलांसमोर वाचत बसा. आपली आई किंवा बाबा रोज पुस्तक वाचतात हे त्यांना कळू द्या. हळूहळू तुमचं पाहून मुलांनाही पुस्तक घ्यावं वाटेल...

 

२. पुस्तक खरेदीला जा

तुमच्या शहरात एखादं पुस्तकांचं मोठं दुकान असेलच. त्या दुकानात एकदा मुलांना घेऊन जा. तिथे त्यांना त्यांच्या वयानुसार उपलब्ध असणारी वेगवेगळी पुस्तकं दाखवा आणि त्यांच्या आवडीने त्यांना काही पुस्तकं घेऊन द्या.

डॉक्टर सांगतात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फक्त ५ गोष्टी करा- म्हातारे झालात तरी नजर राहील तेज

यावेळी अमूकच पुस्तक घे, असा आग्रह त्यांना मुळीच करू नका. कारण त्यांच्या आवडीची पुस्तकं घेतली तरच त्यांच्या मनात त्याविषयीची उत्सूकता निर्माण होईल.

 

३. मुलांना पुस्तक वाचून दाखवा

मुलांना एकदम पुस्तकं वाचण्याची आवड लागणार नाही. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या घरात जी काही पुस्तकं असतील किंवा वर्तमानपत्रात मुलांसाठी आलेल्या काही गोष्टी असतील, त्या मुलांना वाचून दाखवा. वाचताना पुर्ण हावभाव करून, आवाजात गोष्टीनुसार बदल करून वाचा. असं केल्याने पुस्तकं ही काहीतरी मस्त गोष्ट आहे, असं त्यांना वाटेल.

भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

४. पुस्तकं दर्शनी भागात ठेवा

मुलांसाठी असणारी पुस्तकं मुलांना जिथून सहज दिसतील किंवा सहजपणे त्यांना घेता येतील, अशा ठिकाणी ठेवा. यामुळे मुलांना किमान ते पुस्तक हातात घेऊन त्याच्यातली चित्रं पाहण्याची, ते घेऊन चाळण्याची सवय लागेल. 

 

Web Title: interesting ways to introduce reading habit to your child, how to develop reading habits in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.