Lokmat Sakhi >Parenting > ३ वर्षाच्या मुलाला घेऊन तुम्हीही तासभर अभ्यास करता? तज्ज्ञ सांगतात, असं केल्याने किंवा न केल्याने...

३ वर्षाच्या मुलाला घेऊन तुम्हीही तासभर अभ्यास करता? तज्ज्ञ सांगतात, असं केल्याने किंवा न केल्याने...

Is it fine to make your 3 years old child to do study : खरंच इतक्या लहान वयात मुलांना हे सगळं शिकवण्याची आवश्यकता असते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 02:26 PM2023-10-15T14:26:04+5:302023-10-15T14:27:59+5:30

Is it fine to make your 3 years old child to do study : खरंच इतक्या लहान वयात मुलांना हे सगळं शिकवण्याची आवश्यकता असते का?

Is it fine to make your 3 years old child to do study : Do you study for an hour with a 3 year old? Experts say, to do or not to… | ३ वर्षाच्या मुलाला घेऊन तुम्हीही तासभर अभ्यास करता? तज्ज्ञ सांगतात, असं केल्याने किंवा न केल्याने...

३ वर्षाच्या मुलाला घेऊन तुम्हीही तासभर अभ्यास करता? तज्ज्ञ सांगतात, असं केल्याने किंवा न केल्याने...

मुलांना सांभाळणे म्हणजे एकच गोष्ट नसते तर पालकांसाठी हे खऱ्या अर्थाने एक ट्रेनिंग असते. त्यांना फक्त खाऊ-पिऊ घालून उपयोग नसतो, तर त्यांना चांगल्या सवयी लावणे, संस्कार करणे, त्यांची मानसिकता समजून घेणे, ती जपणे, अभ्यासाच्या किंवा इतर गोष्टींचे ज्ञान त्यांना देणे अशा बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. आपले मूल हुशार असावे आणि त्याने सगळ्यात नाव कमवावे अशी आपली कायम इच्छा असते. यासाठी आपण मुलांचे रोजचे शेड्यूल, त्यांचा अभ्यास याकडे बारकाईने लक्ष घालतो. अगदी मूल बोलायचा अवकाश आपण त्यांना अंक, अक्षरं, शब्द, रंग यांची ओळख करुन द्यायला सुरुवात करतो. पण खरंच इतक्या लहान वयात मुलांना हे सगळं शिकवण्याची आवश्यकता असते का? प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. मुलांना लहान वयापासून शिक्षणाचे धडे सुरू करण्याबाबत त्या काय सांगतात पाहूया (Is it fine to make your 3 years old child to do study)...

१. काही मुलं खूप दंगा करतात आणि सतत इकडून तिकडे करत राहतात. अशावेळी त्यांना एका ठिकाणी बसवण्यासाठी पालक काही वेळा काही अॅक्टीव्हीटीज प्लॅन करतात. हे जरी ठिक असले तरी अवघ्या २ ते ३ वर्षाच्या मुलांना विविध देश, त्यांच्या राजधान्या, त्यांचे झेंडे अशा गोष्टी शिकवण्यासाठी नियमितपणे बसवून ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न प्रिती यांनी उपस्थित केला आहे. 

२. मुलांनी अशाप्रकारे एकाजागी बसावे यासाठी त्यांना मोटर स्कील्स, सेन्सरी अॅक्टीव्हीटीज आपण नक्कीच देऊ शकतो. यामध्ये क्ले, पाणी, खडूने गिरगोट्या मारणे, कागद या गोष्टी खेळण्यासाठी देऊ शकतो. बाजारात यासाठी विविध प्रकारचे पझल्स, गेम्सही अगदी सहज उपलब्ध असतात. पण ३ वर्षाच्या मुलासोबत बसून १ तास अभ्यास करण्याची काहीच आवश्यकता नसते. 

३. मुलांना शिकवणे हे शाळेचे काम आहे ते काम शाळेला करु द्या. तसंच मुलांना ३ वर्षापासून अभ्यास करायला बसवाल तर ते जेव्हा १३ वर्षाचे होतील तेव्हा ते अजिबात अभ्यास करणार नाहीत हे पालक म्हणून आपण लक्षात घ्यायला हवे. 
 

Web Title: Is it fine to make your 3 years old child to do study : Do you study for an hour with a 3 year old? Experts say, to do or not to…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.