Lokmat Sakhi >Parenting > मुलांना रोज सकाळी चहा बिस्कीट देणं चांगलं की वाईट? चाईल्ड स्पेशालिस्ट सांगतात....

मुलांना रोज सकाळी चहा बिस्कीट देणं चांगलं की वाईट? चाईल्ड स्पेशालिस्ट सांगतात....

Is it good or bad to give tea biscuits to children : चहा बिस्कीट्स खाल्ल्यामुळे तुमचं पोट बाहेर येऊ शकतं. यातील कॅफेन आणि बिस्किट्समधील साखर, सॅच्युरेडेट फॅट लठ्ठपणा आणि वजन वाढवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:32 PM2024-09-03T17:32:47+5:302024-09-03T21:00:26+5:30

Is it good or bad to give tea biscuits to children : चहा बिस्कीट्स खाल्ल्यामुळे तुमचं पोट बाहेर येऊ शकतं. यातील कॅफेन आणि बिस्किट्समधील साखर, सॅच्युरेडेट फॅट लठ्ठपणा आणि वजन वाढवतात.

Is it good or bad to give tea biscuits to children every morning Child Specialist Says…. | मुलांना रोज सकाळी चहा बिस्कीट देणं चांगलं की वाईट? चाईल्ड स्पेशालिस्ट सांगतात....

मुलांना रोज सकाळी चहा बिस्कीट देणं चांगलं की वाईट? चाईल्ड स्पेशालिस्ट सांगतात....

जन्मल्यानंतर ६ महिने बाळाला आईचं दूध पाजलं जातं. मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आईचं दूध उत्तम मानलं जातं. ६ महिन्यांच्या वयात पोहोचल्यानंतर मुलांना  योग्य आहार देणं सुरू करायला हवं ज्यात फळं, भाज्या, सेरेलेक यांसारख्या पौष्टीक पदार्थांचा समावेश असायला हवा. अनेक घरांमध्ये आई वडील मुलांना चहा बिस्कीट्स बुडवून खायला देतात. डॉ. शिला अगालेचा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी मुलांना चहा बिस्कीट्स खायला देणं कितपत योग्य आहे यावर चर्चा केली आहे. (Is it good or bad to give tea biscuits to children)

बालरोगतज्ज्ञ डॉ. शिला अगालेचा  व्हिडिओमध्ये सांगताात की या पद्धतीने चहा बिस्किट्स खाणं मुलांसाठी योग्य नाही. कारण बिस्किटमध्ये मैदा, साखर आणि पाम तेल असते जे मुलांचे आरोग्य खराब  करू शकते. ज्यामुळे मुलं अधिक चंचल बनतात.  स्वस्थ झोप येत नाही. मुलांच्या शरीरात आयर्न कमी होऊ शकते. 


बेकिंग सोडायुक्त बिस्कीट्स मुलांमध्ये एसिड  रिफ्लेक्सला ट्रिगर करतात. याव्यतिरिक्त बिस्कीट्समध्ये फ्लेवरींग केमिकल्समुळे फुफ्फुसांना आजार आणि ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. मैद्याचे सेवन मुलांनी आणि वयस्कर लोकांनी केल्यास त्यांना कॉन्सिटपेशन, अन्न पचायला वेळ लागणं या समस्या उद्भवू शकतात  कारण यात फायबर्सची कमतरता असते. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. गॅसच्या त्रासामुळे उलट्या होण, पोटदुखी, पोट फुगणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

रितेश देशमुखची फेव्हरीट कुरकुरीत भेंडी करण्याची सोपी रेसिपी; गिळगिळीत भेंडी खाणंच विसराल

चहा बिस्कीट्स खाल्ल्यामुळे तुमचं पोट बाहेर येऊ शकतं. यातील कॅफेन  आणि बिस्किट्समधील साखर, सॅच्युरेडेट फॅट लठ्ठपणा आणि वजन वाढवतात. रिकाम्यापोटी सकाळी चही प्यायल्यानं शरीरात जास्तीत जास्त कॅलरीज घेतल्या जातात. बिस्किट्सची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात प्रिजर्व्हेटिव्हज आणि केमिकल्सचा मिसळले जाता. ज्यात मीठ, साखर यांचे प्रमाण जास्त असते. ब्लड  शुगर लेव्हल नियंत्रणात  ठेवण्यात हे फायदेशीर ठरते. अशा स्थितीत तुम्ही चहा बिस्कीटचे सेवन करू शकता. ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. 

पाठीत- गुडघ्यांमध्ये वेदना-हाडं कमजोर झाली? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, दुखणं होईल कमी

बिस्कीटात आढळणारी रिफाईंड शुगर तब्येतीसाठी जराही चांगली नसेत. यामुळे तुमची स्किन खराब होऊ शकते. त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. पिंपल्स  येण्याची शक्यता वाढते. ब्लड प्रेशर वाढवण्याची समस्या उद्भवल्यास बीपी हाय होण्याचा धोका वाढतो. 

Web Title: Is it good or bad to give tea biscuits to children every morning Child Specialist Says….

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.