Join us  

लहान मुलांना चहा प्यायला द्यावा की नाही? वाढीच्या वयात चहा पिणं फायद्याचं की तोट्याचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 7:13 PM

Is It Safe For Kids To Drink Tea? अनेक घरात मुलंही मोठ्यांसोबत चहा पितात पण त्याचा त्यांना फायदा होतो की तोटाच होतो?

चहाची तलफ काय असते, हे फक्त चहाप्रेमींना ठाऊक आहे. चहाला वेळ नसतो, मात्र, वेळेला चहा हवाच. चहा प्यायल्याने थकवा, स्ट्रेस, झोप उडते, व फ्रेश वाटू लागतं. त्यामुळे चहा हा सर्वांसाठी जीव की प्राण आहे. पण लहान मुलांना चहा देणं कितपत योग्य? लहानपणापासूनच चहाची सवयी कितपत घातक? चहा सर्वांच्याच आवडीचा पेय, पण लहान मुलांना चहाची सवयी लागल्यावर काय करावे? कोणत्या वयात मुलांना चहा देणं योग्य ठरेल? चहा प्याल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम घडतात हे पाहूयात(Is It Safe For Kids To Drink Tea?).

१२ वर्षाखालील मुलांना चहा देऊ नये

कॅफिनयुक्त गोड पदार्थांचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये दात किडण्याची समस्या वाढते. म्हणजेच कॅव्हिटी होऊ शकते. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, ''१२ वर्षांखालील लहान मुलांना कॅफीनयुक्त पदार्थ देऊ नये, याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे त्यांना चहा किंवा कॉफी देणे टाळावे. त्याऐवजी दूध किंवा हरबल चहा फायदेचं ठरू शकते.''

मुलांना नियमांत करकचून बांधून ठेवलं तर मुलं ऐकतच नाहीत! ४ गोष्टी पालकांनी करायलाच हव्यात

फक्त शारीरिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर..

अनेक पालक लहान मुलांना चहासोबत बिस्कीट, नमकीन, टोस्ट खायला देतात. यामुळे त्यांना चहा पिण्याची सवयी लागते. मोठ्या माणसांसारखं संध्याकाळ झाली की, चहा प्यायला मागतात.  चहा असो किंवा कॉफी, या गरम पेयांमध्ये भरपूर कॅफिन आणि साखर आढळते. कॅफिन आणि साखर दोन्ही आरोग्यावर वाईट परिणाम करण्याचे काम करतात. याचा केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर मुलांच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होते.

मुलं सकाळी लवकर उठतच नाही? करा ४ सोप्या गोष्टी, मुलं उठतील हाक न मारता..

मुलांवर होते कॅफिनचे वाईट परिणाम

१२ ते १८ वयोगटातील मुलांनी १०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये. यामुळे त्यांना चहा व कॉफी पिण्याची सवयी लागते. त्यांना जर सतत कॉफी - चहा देत राहिलात तर, हाडे कमकुवत, झोपेची कमतरता, चिडचिडेपणा, मधुमेह, डिहायड्रेशन, दाताला कीड लागणे, वजन वाढणे या समस्या उद्भवू शकते. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य