अनेकांना अतरंगी सवयी असतात. काहींना नाकात बोटं घालण्याची सवय असते. ही सवय लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. कुणी नाकात बोटं घातलं की त्याची थट्टा उडवली जाते. नाकात बोटं घालण्याची सवय हा थट्टेचा नसून गंभीरतेचा आहे. लहान मुलं जर नाकात बोटं घालत असतील तर ही सवय वेळीच मोडायला हवी. नाहीतर ही सवय मोठे झाल्यावरही कायम राहते. त्यामुळे ही सवय का उद्भवते? नाकात बोटं घालण्याचं कारण काय? नाकात बोटं घालण्याची सवय मोडण्यासाठी काय करावे? याची माहिती पाहूयात(Is your kid's nose picking bad? And how to stop it).
नोज पीकिंग म्हणजे काय?
लहानमुलांमध्ये नोज पीकिंगची वाईट सवयी असते. नोज पीकिंग करत असताना बरेच लहान मुलं म्युकस काढून तोंडात घालतात. नाकात बोटं घातल्यामुळे बोटांवर अनेक घातक किटाणू चिपकतात. जे तोंडात जाऊन गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..
नाकात बोटं घालण्याची सवय का वाईट?
२०१८ मध्ये युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ''नोज पीकिंगमुळे न्यूमोनियाचे जीवाणू पसरू शकतात. याशिवाय सतत नाकात बोटं घातल्यामुळे नाकाच्या आत दुखापत होऊ शकते, ज्यामुळे इन्फेक्शन, नाकातून रक्तस्राव आणि नाकाच्या आत फोड देखील निर्माण होऊ शकते, ज्याला बरे होण्यास बराच वेळ लागू शकते. लहानपणीच ही सवय मोडली गेली नाही तर, ही सवय मोडणे अवघड होऊन जाते.
लहान मुलं नाकात बोटं का घालतात?
नाकात नमी अथवा कोरडेपणा जाणवल्यास मुलं सतत नाकात बोटं घालतात.
चिंताग्रस्त अथवा तणाव जाणवल्यास लहान मुलं नोज पीकिंग करतात.
लहान मुलांना बोरिंग वाटल्यास ते नाकात बोटं घालतात.
इन्फेशन अथवा इरिटेशन जाणवल्यास लहान मुलं नाकात बोटं घालतात.
लहान मुलांमध्ये नोज पीकिंगची सवय मोडण्यासाठी टिप्स
लहान मुलांना इतर कामात व्यस्त ठेवा
अधिकतर लहान मुलं रिकाम्या वेळेत नाकात बोटं घालतात. ही सवय मोडण्यासाठी त्यांना इतर कामात किंवा फिजिकल एक्टिविटीमध्ये व्यस्त ठेवा.
जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यावरच पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात, पाणी किती-कधी प्यावं
रागवण्यापेक्षा समजावून सांगा
लहान मुलांवर रागवण्यापेक्षा त्यांना समजावून सांगा. नाकात बोटं घालण्याची सवय ही वाईट असते, या सवयीमुळे नाकाला दुखापत होऊ शकते. यासह इतर आजार देखील उद्भवू शकतात.
नाकाला मॉइश्चराइज करा
अनेकदा नाकातील ड्रायनेसमुळे नाकात सतत खाज सुटते. खाज सुटल्यावर लहान मुलं नाकात बोटं घालतात. अशा परिस्थितीत नाकाला आतून मॉइश्चराइज ठेवा. ज्यामुळे लहान मुलं नाकात बोटं घालणार नाही. तरी देखील लहान मुलांची नाकात बोटं घालण्याची सवय मोडत नसेल तर, बालरोग तज्ज्ञांकडून सल्ला घ्या.