थंडी वाढली की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्वचेला हिवाळ्यातले थंड, कोरडे वातावरण सहन होत नाही. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. भुरकट दिसू लागते, अंगाला खाजही येते. त्वचा कोरडी पडण्याचा त्रास मोठ्या माणसांपेक्षाही लहान मुलांना, बाळांना जास्त होतो. कारण त्यांची त्वचा अतिशय नाजूक, संवेदनशील असते. म्हणूनच अशा नाजूक त्वचेची काळजीही अतिशय हळूवारपणे घेतली जाणे गरजेचे आहे. खास त्यासाठीच जॉन्सन्स बेबी क्रीम तयार करण्यात आले असून ते बाळाच्या त्वचेसाठी जणू हिवाळ्यात एखाद्या संरक्षण कवचाप्रमाणे काम करते. कारण बाळाच्या त्वचेची योग्य काळजी हीच प्राथमिकता असल्याने एक खास फॉर्म्युला तयार करून जॉन्सन्स बेबी क्रीम तयार करण्यात आले आहे.
हिवाळ्यात बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?
याविषयी तज्ज्ञ सांगतात की हिवाळ्यात बाळाची त्वचा कोरडी पडू नये म्हणून बाळाची आंघोळ झाल्यानंतर त्याचे अंग मऊ कापडाने पुसून छान कोरडे करायला हवे. त्वचेला मॉईश्चराईज करणे फार आवश्यक. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा मऊ, मुलायम होते. त्यासाठी जॉन्सन्स बेबी क्रीमची खूप मदत होते.
https://www.johnsonsbaby.in/protectfromdayone
यासोबतच हिवाळ्यात बाळाला आंघोळ घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे.
१. पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या गारव्यात बाळाला नेहमीपेक्षा थोडी पटकन म्हणजेच फक्त ५ ते १० मिनिटांत आंघोळ घालावी.
२. थंडीमध्ये बाळाला एक दिवसाआड आंघोळ घातली तरी चालेल.
३. बाळाच्या आंघोळीसाठी तुम्ही जो साबण वापरणार आहात तो देखील अतिशय सौम्य हवा. कारण खूप हार्ड साबण या दिवसांत बाळाच्या नाजूक त्वचेला सहन होत नाही.
४. याशिवाय आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नका. कारण कडक पाण्यामुळे त्वचेतले नैसर्गिक माॅईश्चर कमी होऊन ती लवकर कोरडी पडू शकते. कोमट पाणी घ्या. गार ही नको.
५. आंघोळ घालून अंग पुसल्यानंतर बाळाला जॉन्सन्स बेबी क्रीम अवश्य लावावे. कारण ते बाळाच्या त्वचेच्या दृष्टीने योग्य ठरणाऱ्या अनेक सौम्य घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे.
६. जॉन्सन्स बेबी क्रीममध्ये असणारा कॅमोमाइल हा घटक ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असणारा आहे. त्यामुळे त्वचेवर खाज येत नाही. त्वचा मुलायम राहते. शिवाय त्यात असणाऱ्या ग्लिसरीनमुळे त्वचेला खूप छान मॉईश्चराईज केले जाते. त्यामुळे हिवाळ्यातल्या थंड, कोरड्या हवेचा परिणाम त्वचेवर होत नाही.
७. हिवाळ्यात सगळ्याच अंगाची त्वचा कोरडी पडते. पण बाळाच्या हाताचे कोपरे, गुडघे, तळपाय हे भाग जरा जास्त कोरडे पडतात. त्यामुळे या भागांची थोडी जास्त काळजी घ्या. तिथे अधिक काळजीपुर्वक जॉन्सन्स बेबी क्रीम लावा.
८. बाळाची अशी काळजी दररोज घेतली तर हिवाळ्यात बाळाच्या त्वचेला कोणताही त्रास होणार नाही.
९. तुम्ही बाळाला सकाळी एकदा क्रीम लावले की ते दिवसभर तुमच्या बाळाच्या त्वचेची काळजी घेते.
१०. त्यामुळे हिवाळ्यात जाॅन्सन्स बेबी क्रीमचा वापर अगदी न विसरता करायला हवा.