Join us  

"नविन गोष्टी करायला माझी मुलं मुळीच घाबरत नाहीत, कारण.....", काजोल सांगतेय तिच्या मुलांच्या गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2023 4:20 PM

Kajol Says About Daughter Nysa and Son Yug: मुलाखतीदरम्यान विषय निघताच काजोल तिच्या मुलांशी भरभरून बोलत असते. आताही एका मुलाखतीमध्ये असंच तिने तिच्या मुलांच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे.

ठळक मुद्देकाजोल म्हणाली की तिची दोन्ही मुले नव्या गोष्टी करण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात एखादा नवा प्रयोग करण्यासाठी मुळीच घाबरत नाहीत.

काजोल आणि अजय देवगण (Kajol and Ajay Devgan) हे बॉलीवूडमधलं एक आदर्श जोडपं. काजोल अभिनेत्री म्हणून जशी लोकांना माहिती आहे, तशीच ती एक आई म्हणून कशी आहे, याचीही तिच्या चाहत्यांना चांगलीच माहिती आहे. कारण न्यासा आणि युग या अजय- काजोलच्या (Nysa and Yug) स्टार किड्सची सोशल मिडियावर नेहमीच चर्चा असते. तसेच काजोलही बऱ्याचदा मुलाखतींमधून तिच्या मुलांविषयी भरभरून बोलत असते. आता नुकतीच तिची Soul Safar with Bhaav या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. यावेळी न्यासा आणि युग या तिच्या दोन्ही मुलांबद्दल तिने भरभरून गप्पा मारल्या.

 

यावेळी बोलताना काजोल म्हणाली की तिची दोन्ही मुले नव्या गोष्टी करण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात एखादा नवा प्रयोग करण्यासाठी मुळीच घाबरत नाहीत. आपण हरू की जिंकू याची भीती त्यांना कधीच वाटत नाही.

 

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

कारण त्यांना माहिती आहे की काहीही झालं तरी आपली आई नेहमीच आपल्या पाठीशी उभी असणार आहे. मी देखील त्यांना कायम याच गोष्टीचा विश्वास देत असते. त्यामुळेच त्यांच्यात धाडस निर्माण होते. मुलांच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहावं, याचं बाळकडू काजोलला तिच्या आईकडून मिळालेलं असणार असं वाटतं. कारण काही दिवसांपुर्वी तिने तिच्या आईचा म्हणजेच अभिनेत्री तनुजा यांचा असाच एक किस्सा शेअर केला होता. 

 

त्या मुलाखतीत बोलताना काजोल तनुजा यांच्याविषयी असं म्हणाली होती की आई मला नेहमी म्हणायची की तु पडलीस तरी मी तुझ्या पाठीशी उभी असणार आहे.

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

पण फक्त तुझं पडणं आणि त्यामुळे तुला होणाऱ्या जखमा, वेदना या मात्र तुझ्या तुलाच सोसायच्या आहेत. यातूनच आता असं दिसतंय की काजोल जे तिच्या आईकडून शिकली तेच आता तिच्या मुलांना शिकविण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न आहे...  

टॅग्स :पालकत्वकाजोलअजय देवगण