Lokmat Sakhi >Parenting > ..तर आपल्या आईचंसुद्धा ऐकू नका! काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव

..तर आपल्या आईचंसुद्धा ऐकू नका! काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव

Kajol Speaks On Hardest Things About Motherhood : आई झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया मानसिक दबावाखाली असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:29 PM2024-10-03T15:29:55+5:302024-10-03T16:04:01+5:30

Kajol Speaks On Hardest Things About Motherhood : आई झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया मानसिक दबावाखाली असतात.

Kajol Speaks On Hardest Things About Motherhood And Tell New Moms Not Take Anyones Advice | ..तर आपल्या आईचंसुद्धा ऐकू नका! काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव

..तर आपल्या आईचंसुद्धा ऐकू नका! काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव

'अगं, ऐकलं का कोमट तेलानंच बाळाची मालिश कर, तू बाळाला काजळ का नाही लावत, डोळे लहानच राहतील. मुलाला दुधात घालून बिस्किट्स खायला दे..'. आई झाल्यानंतर असे वेगवेगळे सल्ले ऐकायला मिळतात. आई झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया मानसिक दबावाखाली असतात. त्यांना सगळं काही परफेक्ट करायचं असतं. (Kajol Speaks On Hardest Things About Motherhood)

मुलांचे पालनपोषण करण्यापासून ते मुलांच्या प्रत्येक गरजेबाबत आईलाच बोललं जातं. अशावेळी तुम्ही वर्किंग वूमन असाल तर तुमचे चॅलेंन्जेस दुप्पट होतात. मुलं शाळेत जाईपर्यंत आईला बरेच सल्ले मिळतात. अनेकदा आईला मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. अभिनेत्री काजोल सांगते की कोणाचाच सल्ला अजिबात ऐकू नका. (Kajol Tells New Moms Not Take Anyones Advice To Be A Bad Or Good Mother)

काजोल न्यासा आणि युग या दोन मुलांची आई आहे. आपलं करिअर बाजूला ठेवत काजोलनं आपल्या मुलांना घडवलं. काजोलनं आपल्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल सांगितले की, मला आई बनायचे होते ती माझी चॉईस होती, मला कधीच असं वाटलं नाही की मी मुलांसाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केला आहे. मला असं वाटतं की तेव्हा मी मुलांच्या खूपच मागे लागले होते. पण त्यावेळी मला ते योग्य वाटत होते. (Kajol Tells New Moms Not Take Anyones Advice To Be A Bad Or Good Mother)

ऐन सणासुधीला मान काळवंडलेली दिसते? चमचाभर बेसनात 'हा' पदार्थ मिसळून लावा; चमकेल मान

काजोल प्रत्येक आई होणाऱ्या स्त्रीला सांगते की, ''कोणाचेही काही न ऐकता आनंदाने पालकत्व स्वीकारा. अभिनेत्रीनं सांगितले की, प्रत्येक आई एक वेगळी असते. प्रत्येक आईची मुलाला मोठं करण्याची तिची पद्धत असते. तिला बरेच सल्ले मिळत असतात. हे खरं आहे कारण मला आई झाल्यानंतर असं करा, तसं कर असे बरेच सल्ले मिळाले. पण आपलं मन जे म्हणेल तेच करायला हवं. कारण तुम्हाला कधीच याचे क्रेडीट मिळणार नाही.''

काजोल नवीन आई झालेल्या महिलांना सांगते की, ''तुम्ही तुमच्यासाठी स्वत: उभं राहायला हवं. मुलांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.  मला आठवतं की माझ्या बिल्डींगमध्ये एक नवीनच  आई झालेली महिला राहायला आली होती. तिला २ मुलं होते. तिच्या मुलाला डाऊन सिड्रोंम होता आणि एक मुलगी होती  जी ठिक होती पण १ वर्षाने लहान होती. ती महिला वर्किंग वूमन होती. तिनं आपल्या परीनं निर्णय घेतला. माझं म्हणणं असं आहे की कोणाचा सल्ला घेण्यापेक्षा स्वत:चं मन काय सांगतंय ते ऐका.''

Web Title: Kajol Speaks On Hardest Things About Motherhood And Tell New Moms Not Take Anyones Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.