Join us  

मुलांचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी करिना कपूरने केली 'ही' युक्ती! तुमच्याही नक्कीच कामी येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 1:54 PM

Kareena Kapoor Reveals About The Screen Time Of Her Kids: तुमच्या मुलांचा स्क्रिन टाईम कमी करायचा असेल तर तुम्हीही करिना कपूरने केली आहे तशी युक्ती करून पाहू शकता... (Kareena Kapoor explains how she manage her children's screen time)

ठळक मुद्देकरिना म्हणते हल्ली पालकांना मुलांना जसं घडवायचं असतं तसं त्यांना स्वत:ला आधी व्हावं लागतं.

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असणारी करिना कपूर तैमूर आणि जेह या दोन मुलांची आईसुद्धा आहे. त्यामुळे करिअरवर जसा तिला फोकस ठेवावा लागतो, तेवढंच मुलांवरही कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं. कारण अभिनेत्री असली तरीही तिच्यामागे आईपण आहेच. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना मुलांना वाढविताना जे प्रश्न पडतात, त्यातले बरेच प्रश्न तिच्यासमोरही आहेतच. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांचा स्क्रिन टाईम. हल्ली बहुतांश पालक मुलांच्या वाढत्या स्क्रिन टाईममुळे वैतागले आहेत. मुलांचं टीव्ही, मोबाईल बघत बसण्याचं वेड कसं कमी करावं, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तोच प्रश्न करिनासमोरही होताच. बघा तिने त्यावर कसा पर्याय शोधून काढला....(Kareena Kapoor explains how she manage her children's screen time)

 

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत करिनाला मुलांच्या स्क्रिन टाईमविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली की सोमवार ते शुक्रवार तिच्या मुलांचा स्क्रिनटाईम जवळपास नसतोच. त्यानंतर शनिवार- रविवार त्यांना थोडा वेळ टीव्ही, मोबाईल पाहण्याची परवानगी दिली जाते.

नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

याबाबतचा एक किस्सा सांगताना करिना म्हणाली की जेव्हा तिच्या मुलांना तिने टीव्ही, मोबाईल पाहण्याची परवानगी नाकारली, तेव्हा तिच्या मुलांनी तिला थेटच प्रश्न विचारला की मग तु मोबाईल आणि टीव्ही का बघत असतेस... मुलाच्या या प्रश्नानंतर करिनाने स्वत:मध्ये अनेक बदल केले. त्या बदलांचा परिणाम आपसूकच मुलांचा स्क्रिन टाईम कमी होण्यावर झाला...

 

मुलांचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी करिनाने केलेला उपाय

मुलांचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी करिनाने सगळ्यात आधी स्वत:ची टीव्ही, मोबाईल पाहण्याची सवय खूप कमी केली. करिना म्हणते हल्ली पालकांना मुलांना जसं घडवायचं असतं तसं त्यांना स्वत:ला आधी व्हावं लागतं. माझ्या मुलांनी कमीतकमी स्क्रिन पाहावी असं मला वाटतं.

ना माती ना कुंडी- फक्त १ बटाटा घेऊन गुलाबाच्या देठापासून तयार करा भरपूर फुलं देणारं रोप 

त्यामुळे मी त्यांच्यासमोर स्क्रिन बघणं कटाक्षाने टाळते. रात्रीसुद्धा मुलं झोपेपर्यंत मी पुस्तक वाचत बसते. त्यानंतरच आणि काही काम असेल तरच मोबाईल बघते.. करिना जे सांगतेय ते खरोखरच पटण्यासारखं आहे. मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवायचं आणि स्वत: कायम गरज नसतानाही मोबाईलमध्ये पाहायचं, हा मोठाचा विरोधाभास आहे. तो कमी झाला तर नक्कीच मुलं यातून शिकतील आणि त्यांचा स्क्रिनटाईम कमी होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :पालकत्वकरिना कपूरतैमुर