Lokmat Sakhi >Parenting > मूल नापास झालं-अपयशी ठरलं तर? चिडणाऱ्या बाबांना विकास दिव्यकीर्ती सांगतात १ टीप

मूल नापास झालं-अपयशी ठरलं तर? चिडणाऱ्या बाबांना विकास दिव्यकीर्ती सांगतात १ टीप

Kind of Father we all need; By Vikas divyakirti : विकास दिव्यकीर्ती म्हणतात; मुलांना अपयश आल्यावर ओरडू नका; कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 04:08 PM2024-10-02T16:08:13+5:302024-10-02T16:09:47+5:30

Kind of Father we all need; By Vikas divyakirti : विकास दिव्यकीर्ती म्हणतात; मुलांना अपयश आल्यावर ओरडू नका; कारण..

Kind of Father we all need; By Vikas divyakirti | मूल नापास झालं-अपयशी ठरलं तर? चिडणाऱ्या बाबांना विकास दिव्यकीर्ती सांगतात १ टीप

मूल नापास झालं-अपयशी ठरलं तर? चिडणाऱ्या बाबांना विकास दिव्यकीर्ती सांगतात १ टीप

मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची असते (Parenting Tips). मुलांच्या आयुष्यात बरेच चढ - उतार येतात. पण अशावेळेस मुलांना न ओरडता त्यांना धीर देणं गरजेचं आहे. परीक्षेत यश किंवा अपयश हे आपल्याला मेहनतीवर अवलंबून असते. पण जर आपलं मुलं मेहनत घेऊनही अपयशी झालं असेल तर, त्यांना ओरडू नका.

अशाच  एका वडिलांचे उत्तम उदाहरण दृष्टी IAS कोचिंग सेंटरचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती (Vikas divyakirti) यांनी दिली आहे. मध्य प्रदेशमधला एक मुलगा दहावीत नापास झाला. पण वडिलांनी पार्टी देऊन मुलाचं टेन्शन कमी केलं. वडिलांनी मुलासाठी नक्की असं का केलं?(Kind of Father we all need; By Vikas divyakirti).

वडिलांनी मुलाचा असा साजरा केला अपयश

मध्य प्रदेशमधील एका वडिलांनी आपल्या मुलासाठी असं काही केलं जे पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल. त्यांचा एक मुलगा दहावीत नापास झाला. पण त्यांनी मुलाला न ओरडता, वेगळ्या पद्धतीने त्याच कौतुक केलं. वडिलांना मुलाची काळजी वाटू लागली. मित्र - नातेवाईक, शेजारचे आपल्या मुलाच्या अपयशाची चेष्टा करतील. म्हणून त्यांनी एक पार्टी आयोजित केली.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

मुलासाठी खास पार्टी

मुलगा दहावीत नापास झाल्यानंतर वडिलांनी त्याला फटकारले नाही. उलट घरात पार्टीचं नियोजन केलं. या पार्टीत वडिलांनी सर्वांसमोर सांगितलं की, 'माझ्या मुलाने अभ्यासात खूप मेहनत घेतली. याचा मला खूप आनंद आहे. माझं मुलगा आता नापास झाला. पण याचा मला काहीही फरक पडत नाही. माझा मुलगा पुढच्या वर्षी जोमाने प्रयत्न करून उत्तीर्ण होईल.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

हे उदाहरण देत विकास दिव्यकीर्ती यांनी स्पष्ट केले की, मुलांवर अपयशाची खरडपट्टी काढण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे.

सकारात्मक पद्धतीने प्रोत्साहन

विकास यांनी दिलेल्या उदाहरणात आपल्या मुलाला अपयश आल्यावर सकरात्मक पद्धतीने प्रोत्साहन दिले. तो अयशस्वी आहे, तो नालायक आहे किंवा कशातही सक्षम नाही हे त्याला न सांगता, त्याऐवजी त्याने किमान प्रयत्न केला असे सांगितले. त्याने कठोर परिश्रम केले आणि आता त्याला पुढच्या वेळी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. असं म्हणत त्यांनी प्रोत्साहन दिले. 

Web Title: Kind of Father we all need; By Vikas divyakirti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.