सोशल मीडियावर कथावाचक जया किशोरी (Jaya Kishori) यांची खूप क्रेझ दिसून येते. मोटिव्हेशल स्पिकर म्हणून जया किशोऱी नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे व्हिडिओज बरेच लोक ऐकतात आणि त्यांना फॉलोसुद्धा करतात. जया किशोऱी रिलेशिनशिप टिप्सवर बोलतातही अलिकडेच त्यांनी पॅरेंटींगगबाबत काही टिप्स दिल्या आहेत. ज्या फॉलो केल्याने मुलं संस्कारी आणि चांगले बनतील. (Know From Jaya Kishori What Parents Should Do To Make Their Children Capable)
जया किशोरी यांच्या पॅरेटींग टिप्स
1) जया किशोरी सांगतात की जेव्हा मुलं आपल्या बोबड्या शैलीत एखादा चुकीचा शब्द उच्चारतात तेव्हा आपण खूप हसतो. हेच बऱ्याच पालकांचे चुकते. मुलांच्या चुकांवर हसणं म्हणजे त्यांना शिव्या देण्यासाठी अधिक प्रोत्साहन देण्यासारखे आहे. मुलांच्या या सवयींवर हसण्यापेक्षा त्यांना समजावून सांगायला हवं.
2) मुलांनी हात उचलल्यानंतरही अनेक पालक खूप हसतात. पण मुलं मोठं होऊन हात उचलतील तेव्हाच हीच गोष्टी तुमच्यासाठी चुकीची ठरेल. तुम्ही कमी वयातच मुलांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखायला हवं.
3) जेणेकरून भविष्यात समस्या येणार नाही. जेव्हा मुलांसमोर कोणीही चुकीचा व्यवहार करते तेव्हा मुलं लगेच ते कॉपी करतात. म्हणून लक्षपूर्वक ऐकायला हवं आणि मुलांनी चूक केल्यास त्यांना तिथेच थांबवायला हवं.
4) आपल्या मुलांसमोर कधीच खोटं बोलू नका, तुम्ही नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींबरोबर खोटं बोलत असाल आणि लहान मुलं ते ऐकत असतील तर त्याच्या डोक्यात येतं की व्यक्तीने खोटं बोलू नये.
5) याव्यतिरिक्त आई वडिलांनी आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवायला हवं. घरात नेहमीच भांडण होत राहिले तर घरातील वातावरण टॉक्सिक होऊ शकतं. ज्यामुळे मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो. मुलांना चांगल्या सवयी शिकवण्याआधी स्वत: ते फॉलो करताय का ते पाहा.
जया सांगतात की मुलांने एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी ५० टक्के योगदान त्यांच्या आई-वडीलांचे असते ५० टक्के त्यांचे मित्र आणि बाहेरच्या वातावरणाचे असते. मुलं तुमच्यासमोर कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही याकडे लक्ष द्या.