Lokmat Sakhi >Parenting > मुलांसोबत रोज काही ना काही वाचायलाच हवं, तज्ज्ञ सांगतात, याची ३ महत्त्वाची कारणं...

मुलांसोबत रोज काही ना काही वाचायलाच हवं, तज्ज्ञ सांगतात, याची ३ महत्त्वाची कारणं...

Know How Reading is important for Children parenting Tips : वाचनाने मुलांना कशाप्रकारे फायदे होतात हे समजून घ्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 04:42 PM2023-07-26T16:42:28+5:302023-07-26T16:51:50+5:30

Know How Reading is important for Children parenting Tips : वाचनाने मुलांना कशाप्रकारे फायदे होतात हे समजून घ्यायला हवे.

Know How Reading is important for Children parenting Tips : One should read something with children every day, experts say, 3 important reasons... | मुलांसोबत रोज काही ना काही वाचायलाच हवं, तज्ज्ञ सांगतात, याची ३ महत्त्वाची कारणं...

मुलांसोबत रोज काही ना काही वाचायलाच हवं, तज्ज्ञ सांगतात, याची ३ महत्त्वाची कारणं...

वाचन आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं असतं ते आपण नेहमी ऐकत असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वाचनाचे महत्त्व सांगितले जाते. मात्र ही आवड आणि सवय घरातून किंवा शाळेतून डेव्हलप व्हावी लागते. यासाठी थोडी वेगळी मेहनत घेणे गरजेचे असते. लहान वयात वाचनाची गोडी लागली तर पुढे ती गोडी दिर्घकाळ टिकते आणि मग नकळत आपण त्यात रमत जातो. वाचनाने माणूस समृद्ध होतो हे तर खरे आहेच. पण वाचनाने आपल्या इतरही अनेक क्षमतांचा विकास होतो (Know How Reading is important for Children parenting Tips).

लहान वयातच आपल्या मुलांना आपण विविध प्रकारच्या गोष्टी, गाणी किंवा काहीही वाचून दाखवले तर त्यांचा झपाट्याने आणि अतिशय उत्तम विकास होतो. याबाबत बरेच संशोधन झाले असून वाचनाने मुलांना कशाप्रकारे फायदे होतात हे समजून घ्यायला हवे. इन्स्टाग्रामवर पॅरेंटींग विथ ब्रेनिफाय या पेजवर याविषयीचा अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये ३ महत्त्वाचे कोणते फायदे सांगितले आहेत ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. जी मुलं पालकांसोबत रोज काही ना काही वाचतात त्यांचे न्यूरॉलॉजिकल कनेक्शन अतिशय चांगले असते. ही गोष्ट संशोधनातून समोर आली असून मेंदूच्या विकासासाठी अशाप्रकारे मुलांसोबत वाचन करणे अतिशय फायदेशीर असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाचन करत असताना आपल्या पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या क्षमता सुधारतात. 

२.  वाचनामुळे पालक म्हणून तुमचे मुलांशी असलेले संबंध सुधारायला मदत होते. मुलांशी असलेला बाँड स्ट्राँग व्हायला याची चांगली मदत होते. कारण आपण अभ्यासाचे वाचत असो किंवा गोष्टीचे या माध्यमातून आपण आपले अनुभव मुलांशी शेअर करतो आणि त्यांच्यासोबत क्वालिटी वेळ घालवतो. मुलांचं आणि आपलं जग एरवी वेगळं असतं, पण वाचन करत असताना हे जग एक होतं आणि यामुळे मुलांची कल्पकता वाढण्यास मदत होते. 


३. जी मुलं लवकर पालकांसोबत वाचन ऐकतात त्यांचे उच्चार आणि शब्दसंपत्ती खूपच चांगली विकसित होते. भविष्यात अभ्यासात प्रगती करण्यासाठी वाचन, शब्दसंपदा चांगली असणे अतिशय आवश्यक असल्याने अशाप्रकारे वाचन करणे मुलांच्या निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे मुलांसोबत दिवसातून ठराविक वेळ काही ना काही अवश्य वाचायला हवे. 

Web Title: Know How Reading is important for Children parenting Tips : One should read something with children every day, experts say, 3 important reasons...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.