Join us  

जागेपणी मुलांशी बोलतोच, मुलं झोपल्यावर त्यांच्याशी बोलायला हवं, स्लीप टॉकचा खरंच काय फायदा होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 4:44 PM

Know How Sleep Talk Is important for Children Growth : आपण या वेळी त्यांच्याशी बोललेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मेंदूपर्यंत जात असते.

मुलांशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे झोपेतून उठल्यापासून मुलांशी गप्पा मारणं, त्यांच्या लहान मोठ्या प्रश्नांची उत्तरं देत राहणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहणं अशा एक ना अनेक गोष्टी आपण करत असतो. मुलं एखाद्या टिप कागदाप्रमाणे हे सगळं टिपून घेतात आणि त्याचा त्यांच्या डोक्यात कळत-नकळत विचार सुरू असतो. पालक म्हणून आपण बोललेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोक्यात अतिशय फिट असते आणि तिचा कुठे कसा वापर करायचा हेही त्यांना अगदी सहज कळत जाते. एखादा शब्द, वाक्य ते अतिशय नेमकेपणाने, नेमक्या ठिकाणी वापरतात आणि आपल्याला आश्चर्यचकीत करतात (Know How Sleep Talk Is important for Children Growth). 

(Image : Google)

मात्र काही वेळा मुलं खूप हट्टीपणा करतात तर कधी काही केल्या आपलं ऐकत नाहीत. कधी खायला त्रास देतात तर कधी अभ्यासाच्या बाबतीत ऐकत नाहीत. अशावेळी पालक म्हणून काय करायचं हे आपल्यालाही समजेनासे होते. त्यावर एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. मूल झोपल्यावर किंवा झोपेतून उठायच्या आत मुलांशी बोलणं हा तो उपाय आहे. यालाच स्लीप टॉक असंही म्हणतात. यावेळी मुलं खरंतर झोपलेली असतात पण या तासाभरात किंवा २ तासांत मुलांचं जागरुक मन मात्र जागं असतं. आपण या वेळी त्यांच्याशी बोललेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मेंदूपर्यंत जात असते. त्यामुळे मुलांनी ज्या बाबतीत जसं वागायला हवं किंवा प्रगती करायला हवी असं पालक म्हणून आपल्याला वाटतं त्या बाबतीत या काळात मुलांशी बोलणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. 

हा संवाद साधत असताना आपली वाक्य सकारात्मक हवी. नकारात्मक वाक्य वापरुन त्याचा उपयोग होत नाही. आपल्याला मुलांना सांगायच्या गोष्टींची संख्या ५ किंवा त्याहून जास्त असू नये. यासाठी दररोज फक्त ५ ते १० मिनीटे द्यायला हवीत. मात्र त्यामध्ये खंड पडता कामा नये. तसेच आपण सांगत असलेल्या गोष्टी अतिशय हळू आवाजात मुलांना सांगायला हव्यात. हे करताना मुलांच्या डोक्यावरुन, अंगावरुन हळूवार हात फिरवल्यास ते त्यांच्यापर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकते. सुरुवात करताना तुम्ही मुलाची आई किंवा वडील आहात हे सांगा. तू झोपलेलाच राहा असेही म्हणा आणि तुमचे मुलावर किती प्रेम आहे, ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हेही मुलांना सांगायला विसरु नका. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं