Join us  

मुलं काही केल्या ऐकतच नाहीत, मग सतत वादावादी-भांडणं? ४ उपाय, तुम्ही म्हणाल ते सगळं ऐकतील मुलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 5:54 PM

Know How to make children cooperate and listen : आपण मुलांच्या फायद्याचं सांगत असल्याने त्यांनी आपलं ऐकावं अशी आपली किमान अपेक्षा असते...

मुलांनी आपण सांगितलेलं सगळं ऐकावं अशी आपली पालक म्हणून किमान अपेक्षा असते. आपण कायम मुलांच्या भल्यासाठीच त्यांना काही ना काही सांगत असतो. ते जर त्यांनी ऐकलं तर त्यांचं कल्याण होईल अशीच आपली त्यामागची भावना असते. पण काहीवेळा मुलं इतका हट्टीपणा करतात की त्याचंच म्हणणं खरं करतात आणि आपण म्हटलेलं काहीच ऐकत नाहीत. सुरुवातीला काही वेळा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यांना समजावून सांगतो, मग त्यांनी ऐकावे म्हणून कधी ओरडतो तर कधी हातही उगारतो. यामुळे घरातली परिस्थिती तर खराब होतेच पण उगाचच वाद, भांडणं वाढतात आणि पालक आणि मुलांमध्ये संघर्ष निर्माण होतो (Know How to make children cooperate and listen).

 मुलांनी आपलं म्हणणं ऐकावं हा पालकांचा अट्टाहास बरोबर असतो तर आपल्याला आपल्या मनासारखं काहीतरी करु द्यायला हवं ही मुलांची मागणीही काही वेळा रास्त असू शकते. पण मग अशी परिस्थिती रागात किंवा वाद घालून हाताळण्यापेक्षा मुलांना प्रेमाने काही गोष्टी समजावल्या, सांगितल्या तर ते नक्की आपलं ऐकतात. यामुळे वादविवाद तर होत नाहीतच पण आपलं म्हणणं शांतपणे मुलांपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती हाताबाहेर जात नाही आणि प्रत्येकाचे म्हणणे खरे होण्याची शक्यता वाढते.  आता यासाठी नेमकं काय करावं याविषयी समुपदेशक इशिना साधना काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या टिप्स कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)

१. मुलांसोबत ३० मिनिटे खेळायला हवे

मुलांना क्वालिटी टाईम देणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कितीही बिझी असलो तरी मुलांना दिवसभरातील ठराविक वेळ अवश्य द्यायला हवा. त्यामुळे नकळत आपला आणि मुलांचा बाँड चांगला होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर मुलं आपण सांगितलेलं सहज ऐकतील

 २. मुलांशी डील करताना पेशन्स महत्त्वाचे

मुलं अनेकदा आपली सहनशक्ती पाहतात असं आपलं मत असतं. असं वाटणं स्वाभाविक असले तरी लगेचच वैतागून उपयोग नसतो तर आपले पेशन्स म्हणजेच सहनशक्ती वाढवायला हवी

 ३. मुलांना सतत करेक्ट करू नका

मुलं आपल्यापेक्षा लहान आहेत, त्यामुळे त्यांना काहीच कळत नाही. हा आपला गैरसमज असतो. मुलांनी सतत आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे यासाठी आपला अट्टाहास सुरू असतो. पण असे केल्याने त्याचा उलटा परिणाम मुलांवर होऊ शकतो. म्हणूनच मुलांना सतत करेक्ट करणे योग्य नाही.

४. त्यांच्याबद्दल सकारात्मक बोला

मुलांबद्दल बोलताना शक्यता सकारात्मक वाक्यरचनांचा वापर करा. ते कसे चांगले वागतात, आहेत असे दर्शवणारी वाक्य असतील तर नकळत त्यांच्यावर याचा परीणाम होईल आणि ते चांगले वागायला लागतील. या गोष्टी लहान वाटत असल्या तरी मुलांची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्यांनी आपलं ऐकावं यासाठी त्या अतिशय गरजेच्या असतात.    

टॅग्स :पालकत्वलहान मुलं