Join us  

रागाच्या भरात तुम्हीही मुलांवर हात उगारता? मुलांच्या मनातून कधीच जात नाहीत ३ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 1:00 PM

Know the disadvantages of hitting child : मारणे ही रागाची प्रतिक्रिया असली तरी त्याचा मुलांच्या मनावर दिर्घकालिन परीणाम होतो.

एरवी मुलं आपण सांगितलेलं सगळं ऐकतात, शहाण्यासारखे वागतात. पण कधी कधी फारच हट्ट करतात आणि आपले पेशन्स चेक करतात. काहीवेळा ते अजिबात ऐकत नाहीत आणि त्यांना हवं तेच करतात. खूपदा सांगूनही त्यांनी ऐकलं नाही आणि फारच त्रास दिला की आपलाही पारा चढतो. काही वेळा ओरडल्यावर किंवा रागावल्यावर ते घाबरतात. पण तसं करुनही ऐकत नसतील आणि आपल्याला राग अनावर झाला की मात्र नकळत आपण त्यांच्यावर हात उगारतो (Know the disadvantages of hitting child) . 

मुलांना मारलं म्हणून नंतर आपल्याला खूप वाईटही वाटतं. पण त्यावेळी राग सहन न झाल्याने आपला हात उचलला गेलेला असतो. त्यावेळची ती प्रतिक्रिया असली तरी त्याचा मुलांच्या मनावर दिर्घकालिन परीणाम होतो. म्हणूनच मुलांवर हात उगारण्याआधी ४ वेळा विचार करायला हवा. मारणे हा मुलांना सुधरवण्याचा उपाय नाही. त्यापेक्षा शांत राहून मुलांचे वागणे सुधारण्यास मदत करणे जास्त महत्त्वाचे असते.  पाहूयात मारण्याचे मुलांच्या मनावर नेमके काय परीणाम होतात. 

(Image : Google)

१. मुलंही मारकुटे होतात

आपण मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन मारत असू तर एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीवरुन समोरच्याला मारणे अतिशय सामान्य आहे असा मुलांचा समज होण्याची शक्यता असते. एखाद्याने आपले काही ऐकले नाही तर आपणही त्याला मारु शकतो असा मुलांचा समज होतो. त्यामुळे तेही नकळत आई वडीलांवर, घरातील इतर व्यक्तींवर, शाळा, क्लास, पाळणाघर येथील मुलांवर हात उगारतात. 

२. मुलं अॅग्रेसिव्ह होतात

मारणं हा काहीसा हिंसक पर्याय असल्याने मुलांच्या मनावर त्याचा चुकीचा परीणाम होतो. त्यामुळे मारणे आणि अशाप्रकारे हिंसा करणे हे योग्य असते असे त्यांना लहान वयातच वाटायला लागते आणि आपण मुलांना मारले की रागाच्या भरात तेही पालकांना मारतात.

३. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करतात

मुलांना सतत मारत राहीले तर ते निरुपयोगी आहेत असा समज त्यांच्या मनात निर्माण होतो. यामुळे त्यांच्याशी कोणीही चुकीचे वागले तरी ते या चुकीच्या वागण्याचा सहज बळी ठरतात. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं