Lokmat Sakhi >Parenting > १०-११ वर्षांची मुलं डायपर लावून शाळेत जातात, शी-शू लागल्याचे सांगताही येत नाही?

१०-११ वर्षांची मुलं डायपर लावून शाळेत जातात, शी-शू लागल्याचे सांगताही येत नाही?

Know Why 11 Years old Children's Wearing Diaper in Schools : मुलं पॉटी ट्रेन नाही, दहा वर्षांची झाली तरी आपल्याला नैसर्गिक विधी होऊन गेल्याचे त्यांना कळत नाही, ही भयानक समस्या नेमकी काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 01:25 PM2023-06-19T13:25:43+5:302023-06-19T13:26:12+5:30

Know Why 11 Years old Children's Wearing Diaper in Schools : मुलं पॉटी ट्रेन नाही, दहा वर्षांची झाली तरी आपल्याला नैसर्गिक विधी होऊन गेल्याचे त्यांना कळत नाही, ही भयानक समस्या नेमकी काय आहे?

Know Why 11 Years old Children's Wearing Diaper in Schools : 10-11 year old children go to school wearing diapers, can't even tell about Loo and Potty.... | १०-११ वर्षांची मुलं डायपर लावून शाळेत जातात, शी-शू लागल्याचे सांगताही येत नाही?

१०-११ वर्षांची मुलं डायपर लावून शाळेत जातात, शी-शू लागल्याचे सांगताही येत नाही?

अं‌थरुण ओलं करणं ही अनेक मुलांची समस्या असते. झोपेत लघवी होऊन जाते, काहींना अगदी वयाच्या आठ-दहा वर्षांपर्यंत हा त्रास होतो. पण मूल शाळेत जाऊ लागलं तरी डायपर लावावंच लागत असेल तर? खरंतर डायपर ही लहान बाळांसाठी सोय आहे दिड-दोन वर्षांच्या बाळांना पालकही डायपर लावतात. मात्र अडीच-तीन वर्षांचे मूल बोलू शकते, शू-शी लागली सांगू शकते. तसं पॉटी ट्रेनिंग करावं लागतं, अनेकदा मूल आजारी असेल तर या वयातल्या मुलांसाठी डायपर रात्री वापरले जाते. पण १०-११ वर्षांची मुलं आपल्याला शू-शी लागली हे सांगू शकत नसतील आणि पालकांना त्यांना शाळेतही डायपर लावून पाठवावे लागत असेल तर? ही समस्या एका दुसऱ्या मुलाची नाही तर अनेक मुलांची झाली तर? अशीच गंभीर समस्या सध्या स्वित्झर्लंडमधले पालक आणि शिक्षकांसमोर आहे. आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं यानं ते हैराण झाले आहेत (Know Why 11 Years old Children's Wearing Diaper in Schools ).

(Image : Google)
(Image : Google)

नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार स्वित्झर्लंडमध्ये ११ वर्षे वयाच्या मुलांनाही शाळेत डायपर घालून पाठवले जाते. आता इतक्या मोठ्या मुलांना डायपर वापरण्याची आवश्यकता काय आहे? त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परीणाम होतो? ही सवय मुलांना भविष्यात घातक ठरु शकते का? यामागे पालकांचा नेमका काय दृष्टीकोन असू शकतो असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येतात. साधारणपणे मुलं शाळेत जायच्या वयाची झाली की डायपर वापरणे बंद केले जाते. मुलं तोंडानं आपल्याला शी-शू लागली आहे हे सांगू शकतात, स्वत: जातात. पण स्वित्झर्लण्डमध्ये अशी समस्या आहे की पालक मुलांना टॉयलेट वापरण्याची पद्धत शिकवू शकत नसल्याने ते शाळेतही मुलांना डायपर घालून पाठवू लागले आहेत आणि शालेय शिक्षकांसमोर ही एक नवीन समस्या उभी राहिली आहे. आपल्या नैसर्गिक विधी करण्याचं भान लहान वयातच मुलांना येतं, पण मुलं ते ही बसल्या जागी करत असतील तर ही समस्या खरोखर गंभीर आहे.

(Image : Google)
(Image : Google)

नोकरीच्या वेळांमुळे पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी नसलेला वेळ, सोय यांसाठी पालक हे करत असल्याचे समजते. मात्र हे या मुलांसाठी अजिबात योग्य नसल्याचे शिक्षकांचे आणि शिशुविकासाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे १० वर्षानंतरही डायपर वापरणाऱ्या मुलांची वाढत असलेली  संख्या ही खऱ्या अर्थाने चिंतेची बाब असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. इतके मोठे झाल्यानंतरही टॉयलेटचा वापर कसा करायचा याबाबत त्यांना घरातून ट्रेनिंग मिळालेले नसल्याने त्यांची त्यात काहीच चूक नाही. मात्र पालकांनी आपल्या सोयीसाठी मुलांना अशा पद्धतीने वाढवणे योग्य नाही. मूल १.५ ते २ वर्षाचे झाल्यानंतर आपण त्यांना पॉटी ट्रेनिंग म्हणजेच वॉशरुममध्ये लघवी आणि संडासला जाण्याचे ट्रेनिंग देतो. मात्र सध्या पालकांना हे ट्रेनिंग देण्यासाठी वेळ आणि पेशन्स नसल्याने पालक हा सोपा पर्याय वापरताना दिसतात. शाळेत आलेल्या मोठ्या मुलांचे डायपर बदलणे हे एक काम झाले असून त्यासाठी इतकी मोठी मुलं शाळेतच येत नाहीत असे या शिक्षकांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Know Why 11 Years old Children's Wearing Diaper in Schools : 10-11 year old children go to school wearing diapers, can't even tell about Loo and Potty....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.