Join us  

पालकांच्या ४ चुकांमुळे मुलं बिघडतात; श्री श्री रविशंकर सांगतात, मुलांना योग्य वळण लावायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 6:01 PM

KnowYourChild Parenting... - Gurudev Sri Sri Ravi Shankar : मुलांचे संगोपन करताना पालकांनी ४ चुका टाळायला हव्या..

मुलांचे संगोपन करण्यासाठी पालक खूप कष्ट घेतात (Parenting Tips). यादरम्यान पालकांकडूनही काही चुका होतात. मुलं नेहमी पालकांची वागणूक आणि समजूतदारपणा अशा काही गोष्टी पाहूनच शिकत असतात (Shri Shri Ravi Shankar). त्यामुळे बरेच मुलं आपल्या पालकांना रोल मॉडेल म्हणून पाहतात.

पालकांनी मुलांचे संगोपन करताना कोणत्या चुका टाळायला हव्या? याची माहिती बऱ्याच पालकांना नसते. मुलांचे संगोपन करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात? याची माहिती श्री श्री रविशंकर यांच्या साईटवर देण्यात आली आहे(KnowYourChild Parenting... - Gurudev Sri Sri Ravi Shankar).

मुलांचे संगोपन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

जेव्हा आपण मुलांना शिकवतो किंवा त्यांना काही गोष्टी सांगतो, तेव्हा नकळत आपण नकारात्मक बोलतो. ज्यामुळे मुलांच्या मनावार परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बोलताना आपल्या शब्दांकडे लक्ष द्या.

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

सकारात्मक गोष्टी शेअर करा

मुलांबरोबर नेहमी सकारात्मक गोष्टी शेअर करा, त्यांचा मनोबल कमी होईल, असं काही बोलू नका. यामुळे त्यांचा कॉण्फिडेन्स कमी होतो. त्यामुळे शक्यतो मुलांसोबत बोलताना त्यांच्या मनाचा विचार करून बोला.

मुलांचे अति लाड करणे टाळा

बरेच पालक मुलांवर प्रेमाचं वर्षाव करतात. त्यांच्या चुका पदरात घेतात. पण अति लाडामुळेही मुलं बिघडतात. हट्टीही होतात. त्यामुळे मुलांच्या चुका त्यांना समजावून सांगा. ती चूक पुन्हा घडणार नाही अशी शिकवण द्या.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

मुले पालकांकडून कोणत्या गोष्टी शिकतात

मुले त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर कोणतीही चूक करणे टाळावे. ताण, तणाव, किंवा राग करताना स्वतःवर ताबा ठेवावा. पालकांचा ताण किंवा आनंद याचा थेट परिणाम मुलांवर होतो. त्यामुळे पालकांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहणे आवश्यक आहे.

टॅग्स :पालकत्वरिलेशनशिप