Join us  

मुले शिकायला दूरदेशी गेली, माधुरी दीक्षित झाली हळवी! म्हणाली, आता आपल्या या घरात पूर्वीसारखं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 3:20 PM

Madhuri Dixit's Emotional Post For Ryan and Arin: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या मुलांसाठी लिहिलेली एक भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे.... वाचा एक आई म्हणून माधुरी काय सांगतेय तिच्या मुलांना.....

ठळक मुद्देमुलं शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा परदेशात गेल्यावर कोणत्याही सर्वसामान्य आईची जशी अवस्था हाेईल तशीच भावनिक, मानसिक अवस्था सध्या माधुरी दीक्षितची झाली आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने (Madhuri Dixit and Dr. Shriram Nene) हे एक आदर्श जोडपं म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. आरिन आणि रियान (Ryan and Arin) ही त्यांची दोन मुले. माधुरी आणि डॉ. श्रीराम त्यांच्या दोन्ही मुलांना जाणीवपुर्वक ग्लॅमरस जगतापासून दूर ठेवतात. म्हणूनच तर इतर स्टार किड्सची जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा माधुरीच्या दोन्ही मुलांची कधीच होत नाही. आता माधुरीचा मोठा मुलगा आरिन २० वर्षांचा असून लहान मुलगा रियान त्याच्यापेक्षा २ ते ३ वर्षांनी लहान आहे. शिक्षणासाठी माधुरीची दोन्ही मुले परदेशात असून (leave home for college) त्यांच्या आठवणीतच माधुरीने एक इमोशनल पोस्ट (Madhuri Dixit's emotional note) सोशल मिडियावर शेअर केली आहे.

 

या पोस्टमध्ये माधुरीने तिच्या दोन्ही मुलांचे तिच्या सोबतचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती त्यांना म्हणतेय की तुम्ही दोघेही कॉलेजमध्ये गेलेसुद्धा... वेळ कसा निघून गेला काहीच कळले नाही.

पावसाळ्यात घरात भिंतीवर पालीची पिल्ले दिसतात? फक्त २ पदार्थ, हा उपाय करा पाली गायब 

तुम्ही दोघेही आता आयुष्यात जे काही कराल ते बघण्यासाठी तसेच तुमच्यातलं सर्वोत्तम असं बघण्यासाठी मी कायम उत्सूक आहे. I love you always and will miss you immensely, all the time... असं म्हणत माधुरी पुढे म्हणतेय की आपलं घर जसं होतं तसं ते आता तुमच्या दोघांशिवाय मुळीच नाहीये... 

 

मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा परदेशात गेल्यावर कोणत्याही सर्वसामान्य आईची जशी अवस्था हाेईल तशीच भावनिक, मानसिक अवस्था सध्या माधुरी दीक्षितची झाली आहे.

आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट

मागच्यावर्षी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा जेव्हा परदेशात शिकायला गेला होता, तेव्हा मलायकानेही मुलासाठी अशीच भावनिक पोस्ट लिहून तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. आज माधुरीचंही काहीसं तसंच झालं आहे. माधुरीचा मुलगा आरिन सध्या University of Southern California येथे शिक्षण घेत असून आता रियानही परदेशी गेला आहे.  

 

टॅग्स :पालकत्वमाधुरी दिक्षित