लहान मुलं कधी काय बोलतील, याचा खरोखरंच काही नेम नसतो. मुलांची आकलन शक्ती अतिशय जबरदस्त असते. त्यामुळे ते आपल्या आसपास खेळत असतील आणि त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये असं आपल्याला वाटत असेल, तरीही त्यांचा एक कान मात्र सदैव मोठ्यांच्या गप्पा ऐकत असतो. मग असंच कधीतरी मोठ्यांच्या तोंडून ऐकलेलं एखादं वाक्य मुलं त्यांच्या इवल्याशा विश्वात अशा पद्धतीने वापरतात आणि मग त्यांच्या या बोलण्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही.. असंच काहीसं या छोट्या मुलाच्या बाबतीत झालं आहे.
वरवर पाहता हा व्हिडिओ अगदीच मजेदार आहे. त्या मुलाच्या बाेबड्या बोलातून अशी वाक्य ऐकल्यावर हसूही येतं. पण तो खरोखरंच असं का म्हणतो आहे, एवढ्याशा वयात त्याला कसला ताण आला आहे आणि का तो एवढा वैतागलाय, हे देखील बघायला हवं. daiviksharma28 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आजकालची मुलं खरोखरंच खूपच स्मार्ट आहेत. म्हणून तर परवा सोशल मिडियावर एक चिमुकली देवाकडे आई बदलून दे म्हणून प्रार्थना करत होती, तर आज आता हा मुलगा आईसकट सगळ्या जगावरच वैतागला आहे.
बऱ्याच घरात मुलांचा अभ्यास त्यांच्या आई घेतात. त्यामुळे अभ्यासाला बसवणारी आई मुलांच्या दृष्टीने व्हीलन ठरते. व्हिडिओमधल्या या चिमुकल्याचंही तसंच झालं आहे. व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की तो मुलगा अभ्यासाला बसला असून आई त्याचा अभ्यास घेते आहे. काही तरी लिहितो आहे तो. लिहिताना तो मध्येच रडकुंडी येतो आणि त्याच्या आईला म्हणतो ''मै इस दुनिया से निकल जाऊंगा, मुझे इस दुनियामे नही रहना...'' यावर मुलाची आई त्यामागचं कारण विचारते. तर तो अवघा ४- ५ वर्षांचा पठ्ठा म्हणतो की ''मेरा मन नही लगता इस दुनिया में..''.
मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम
हे वाक्य ऐकून आईला नक्कीच धक्का बसला असणार. त्यावर ती विचारते की का नाही लागत तुझं मन, तर त्यावर हे महाशय म्हणतात की ''तुम गंदी हो इसलिये...''. अभ्यास घेणाऱ्या आईविषयी आणि अभ्यासाविषयी या मुलाच्या मनात किती हा वैताग! खरोखरंच एवढ्या लहान वयात या मुलाला अभ्यासाचं एवढं टेन्शन देण्यात आलंय की त्याच्या या सगळ्या बाललीला अभ्यास टाळण्यासाठी आहेत हे त्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईलाच माहिती..