Lokmat Sakhi >Beauty > मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, पाहा सिक्रेट

मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, पाहा सिक्रेट

Malaika Arora Homemade Oil And Mask Recipe : करीना कपूरपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज होम रेमेडीजचा वापर करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:48 PM2024-09-12T15:48:04+5:302024-09-13T14:47:59+5:30

Malaika Arora Homemade Oil And Mask Recipe : करीना कपूरपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज होम रेमेडीजचा वापर करतात.

Malaika Arora Homemade Oil And Mask Recipe For Health And Long Hairs | मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, पाहा सिक्रेट

मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, पाहा सिक्रेट

बॉलिवूडच्या सगळ्यात तरूण आणि सुंदर तरूणींमध्ये मलायका अरोराचा समावेश होतो. तिचे ब्युटी सिक्रेट जाणून घेण्यासाठी सगळेचजण उत्सुक असतात. मलायकाने केस वाढीसाठी तेलाबाबत अनेकवेळा माहिती दिली आहे.  केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. हे तेल बनवण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया. (Malaika Arora Homemade Oil And Mask Recipe For Health And Long Hairs)

करीना कपूरपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज होम रेमेडीजचा वापर करतात. त्वचेसाठी असो किंवा केसांसाठी असतो. असाच एक उपाय मलायका अरोरासुद्धा करते. जो केसांसाठी बराच फायदेशीर आहे. हेल्दी केसांसाठी तेल बनवण्याची योग्य पद्धत कोणती ते तिनं सांगितलं आहे.

केसांसाठी घरगुती तेल तयार करण्यासाठी लागणार साहित्य

नारळाचं तेल -१ कप

कॅस्टर ऑईल - १ कप

ऑलिव्ह ऑईल - १ कप

मेथीचे दाणे- १ मूठ

कढीपत्ता  - १ वाटी

हे तेल तयार करण्यासाठी एक मोठा बाऊल घ्या. त्यात तीन तेलांबरोबर मेथीचे दाणे आणि कढीपत्ते एकत्र करा. २ दिवस हे तेल असंच ठेव नंतर या तेलाचा वापर तुम्ही केसांवर करू शकता.  हे घरगुती तेल परिणामकारक ठरत असल्याचे सांगून मलायलकानं एका हेअर मास्कची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे. जी बरीच फायदेशीर ठरते. याचा वापर तुम्ही सहज करू शकता. हा  हेअर मास्क तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागेल समजून घेऊ.

प्रोटीनचा खजिना फक्त १० रूपयांत; किचनमधले २ पदार्थ रात्री भिजवून खा, ताकद येईल, सद्गुरूंचा सल्ला

केसांसाठी हेअर मास्क तयार करण्यासाठी सगळ्यात आधी १ कांदा घ्या आणि हा कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटलेल्या काद्यांची पेस्ट गाळणीत घालून याचा रस आणि चोथा वेगळा करा. नंतर कांद्याचा रस कापसाच्या मदतीने आपल्या केसांना आणि स्काल्पवर लावा. ३० ते ४५ मिनिटं असंच ठेवून द्या नंतर शॅम्पूने स्वच्छ केस धुवा.

मलायका सांगते की केसांना तेल लावल्यानंतर ते ४५ मिनिटं किंवा १ तास लावू ठेवा त्यानंतर केस धुवा. मलायकाने  शेअर केले की मेथीच्या दाण्यांमध्ये हाय प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते ज्यामुळे केसांना फायदा  होतो. कढीपत्त्यात बीटा कॅरोटीन आणि हाय प्रोटीन असते ज्यामुळे केस गळणं कमी होतं आणि केसांची वाढ चांगली होते. 

Web Title: Malaika Arora Homemade Oil And Mask Recipe For Health And Long Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.