नवरा घरात काहीच काम करत नाही, त्याला साधा चहा येत नाही, घरकाम नको, यावरुन अनेकदा बायका कटकट करतात.(male-ego where does this male ego comes from? Sons behave irresponsibly because their mothers pamper them.) नवराच काय भाऊ, मित्र, मेव्हणे यांनाही म्हणतात की काहीच कसं येत नाही. त्यावरुन टोमणेही त्यांना मारले जातात. पण असं का वागतात ते? का मुलगे लहानपणापासून घरकाम करत नाहीत, त्यांना का वाटतं की ‘मै मर्द हूं!’ ही बायकी कामं मी करणार नाही?
एक सोपं उदाहरणं पाहूया. घरात एक मुलगा एक मुलगी आहे. आईला काही काम सांगायचे असेल तर, आपसुकच ती ताईला हाक मारते. दादाने स्वत:हून मदत करायची म्हटलं तरी, राहू दे ताई करेल असं म्हणते. हे तर प्रत्येक मुलीबरोबर घडतेच. मान्य आहे ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण इथूनच तर त्या मुलाला सगळं आयत मिळण्याची सवय लागते. आईने सगळी कामं ताईला सांगितली. म्हणजे मग तेच बरोबर असणार. असे त्याच्या डोक्यात बसते.
म्हणून आईने..
१. मुलांशी कसं वागायचं हे मुलींना सांगता तसेच एका मुलीशी कसे वागावे हे मुलालाही शिकवा. २. मुला-मुलीमध्ये हा जो भेद घरात पालकांमार्फत केला जातो. तो तसाच पुढे सून-मुलगा यांमध्येही केला जातो.३. पण मुलींचे विचार बदललेले आहेत. त्या कमावत्या आहेत. त्यामुळे त्यांना हे वागणं जास्त खटकतं. मग लग्नानंतर घरकामामुळे वाद होतात.४. तरुण मुलांना वाटतं की जसं माझ्या आईने आजीने विनातक्रार सारं केलं तसंच बायकोनं करावं, ती करत नाही.५. म्हणून घरातूनच आईबाबांनी आपल्या वागण्यातून मुलग्यांनाही जबाबदारी शिकवावं आणि खऱ्या अर्थानं उत्तम माणूस म्हणून घडवणं महत्वाचं.