Join us  

लेक म्हणाली बाबा तुला एकदा रडताना पहायचंय! मनोज वाजपेयी सांगतात, लेकीच्या अजब मागणीचं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 1:36 PM

Manoj Bajpayee says his daughter wanted to see him cry : मनोज वाजपेयी पालक म्हणून येणारे अनुभव शेअर करत सांगतात, मुलांचं लक्ष असतं आईबाबांच्या वागण्याकडे..

मनोज बाजपेयी हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असून त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अतिशय गुणी अभिनेता म्हणून ओळख असलेल्या मनोज याने वेबसिरीज, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा तयार केली आहे. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मनोज बाजपेयी याला 'सिर्फ एक बंदा काफी है' या वेब फिल्मसाठी बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला. तर 'जोरम' या चित्रपटाच्या माध्यमातून मनोज ८ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर  दिसणार आहे. एका लहान मुलीच्या वडिलांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याच पार्श्वभूमीवर मनोज याने एका मुलाखतीत खऱ्या आयुष्यात वडिलांची भूमिका निभावताना येणारे अनुभव शेअर केले (Manoj Bajpayee says his daughter wanted to see him cry) . 

मनोज वाजपेयी सांगतात, माझी मुलगी म्हणाली, मला तुला एकदा रडताना पाहायचे आहे! ही काय भलतीच इच्छा असं वाटेलही पण आजकाल आपण मोठी माणसं फार क्वचित रडतो. चटकन डोळ्यात पाणी आलं असं होत नाही. त्यामुळे मी ही लेकीला म्हणालो की मी कधी रडणार, तेव्हा कसा दिसणार सांगता येत नाही. पण तशी वेळ आलीच. २०२१ मध्ये माझे वडील गेले. आणि ते दु:खच असं की मी रडलोच.आईला जवळ घेऊन मी खू रडलो.त्यावेळी कदाचित माझ्या लेकीने पाहिले असेल की मी कसा रडतो.नंतर एकदा तिने माझ्या रडण्याची ॲक्टिंगही करुन दाखवली.मुलं आपल्याला पाहत असतात, आईबाबांच्या अनेक बारक्या गोष्टीही टिपत असतात.

(Image : Google)

मुलांच्या मनात आपल्या पालकांविषयी बऱ्याच गोष्टी चालू असतात. सगळ्याच ते शब्दात व्यक्त करतात असे नाही. पण बाहेरुन कणखर दिसणारे आपले वडील कसे रडत असतील असा प्रश्न मनोज याची मुलगी अवा हिला पडलेला दिसला. स्क्रिनवर अभिनय करणारे आपले वडील आणि प्रत्यक्षात भावनिक झालेले आपले वडील ही रुपं कदाचित तिला पाहायची असू शकतात. पण ही आगळीवेगळी इच्छा आपल्या मुलीने व्यक्त केल्याच्या गोष्टीबाबत मनोज याने मुलाखतीत स्पष्ट केले.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमनोज वाजपेयी