Join us  

लग्नापूर्वी लेकीशी बोला 'या' ४ गोष्टी, सासरी गेल्यावरही ती राहील कायम आनंदी आणि समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:38 PM

Married Life Tips (Secret Of Happy Married Life): आई वडीलांना लग्नाच्या आधी मुलींना काही हिताच्या गोष्टी शिकवल्या तर त्यांना लग्नानंतर अवघड वाटणार नाही.

काळ बदलतोय तसंच लग्न, रिलेशन, वैवाहिक आयुष्य याबाबतचे विचारही बदलतात. (Married Life Tips) लग्नानंतर मुली दुसऱ्या  कुटुंबात जातात. नवीन कुटुंबात नवीन जबाबदाऱ्याही स्वीकाराव्या लागतात. (Tips For A Healthy Marriage) लग्नानंतरचा काळ हा चांगला तितकाच नाजूकही असतो. आई वडीलांना लग्नाच्या आधी मुलींना काही हिताच्या गोष्टी शिकवल्या तर त्यांना लग्नानंतर अवघड वाटणार नाही.अनेकदा लग्नानंतर मुलींना एकटेपणा येऊ शकतो. (4 Tips For Happy Married Life) किंवा लग्नाच्या निर्णयाबद्दल रिग्रेट होऊ शकतं हे टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (4 Thing All Parents Should Teach Their Daughters Before Getting Married)

1) सन्मानाची भावना

अर्थात मुलींना आपलं मत ठामपणे मांडायाल हवं पण अनेकदा नवीन कुटूंबात गेल्यानंतर काही मुली नवीन व्यक्तींना ऊलट सुलट बोलण्याआधी विचारच करत नाहीत. काही मुलींना छोट्या-मोठ्या गोष्टीसुद्धा सहन होत असतात. अशावेळी मुलींना संयम ठेवायला सांगा इतरांना सन्मान द्यायला शिकवा. रागात काहीही बोलल्ल्यानंतर भांडणं होऊ शकतात. म्हणून संयम ठेवून समजावून सांगा. 

2) आर्थिक स्वातंत्र्य

नवीन घर माहेरच्या कुटुंबापेक्षा अधिक समृद्ध असू शकते. पतीची सॅलरी खूप चांगली असेल तर तुम्हाला काम करण्याची गरजच लागणार नाही. पण सुरूवातीपासून आपल्या मुलीला आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र राहायला शिकवा. आपल्या गरजा मुली आपल्या पैश्यांनी पूर्ण करतील तर त्यांना इतर समस्या येणार नाहीत किंवा पतीकडे, इतरांकडे सतत पैश्यांची मागणीसुद्धा करावी लागणार नाही. अनेक घरांमध्ये पैसे खर्च करण्यावरून टोमणे ऐकावे लागतात. जर मुली स्वत: कमावत असतील तर त्यांना अशा कोणत्याही समस्या येणार नाहीत.

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी 

३) नात्याला वेळ 

मुलींना समजावून सांगा की नातं घट्ट होण्यासाठी वेळ देणं तितकंच महत्वाच असतं.  लग्न झाल्यानंतर खूपच कमी वेळेत  सासू, सासरे, नणंद यांच्याबद्दल तक्रार करणं योग्य नाही. मुलांना समजावून सांगा की नातं स्ट्राँग होण्यासाठी नात्याला थोडा वेळ द्यायला हवा. 

लहानपणापासून मुलांना लावा ५ सवयी-हूशार होतील मुलं, न ओरडता स्वत:हून अभ्यासाला बसतील

४) इतरांचा दृष्टीकोनही महत्त्वाचा

लोक आयुष्यभर एकमेकांबरोबर राहतात पण एकमेकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजू शकत नाहीत. जर तुम्ही विचार केला की तुमच्यासोबत खूपच चुकीचे होत आहे तर त्या स्वत:ही हॅप्पी राहू शकणार नाहीत. मुलांना समजावून सांगा की चूक त्यांच्याकडूनही होऊ शकतात. म्हणून एकमेकांचा पॉईंट् ऑफ व्हिव्ह समजून घ्या. 

टॅग्स :पालकत्व