महिला आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करत आहेत. नोकरी असो वा व्यवसाय, सर्वच क्षेत्रात महिला आता आपले कौशल्य दाखवत आहेत. नोकरी, व्यवसायासोबतच ती मातृत्वाची (How Maternity Pay Has Affected Women's Career) भूमिका देखील तितक्याच जबाबदारीने सांभाळते. स्वतःचे करियर सांभाळत नव्याने आईपणाची कर्तव्ये पार पडताना काहीवेळा तिची ( struggling at work after maternity leave) धावपळ - दमछाक होतेच. यासाठीच, अशा नोकरदार महिलांना प्रसुती काळात आराम मिळावा आणि बालसंगोपनास वेळ मिळावा याकरता कायद्याने प्रसुती रजा (Maternity Leave) मान्य केली आहे. त्यानुसार, प्रत्येक नोकरदार महिलेला ६ महिन्यांची प्रसुती रजा (Maternity leave shouldn't mean a career setback) मंजूर करण्यात आली आहे.
गर्भवती महिलांना बाळंतपणाची सुट्टी मिळणे हा जगभरात पाळला जाणारा नियम आहे. परंतु अशा महिलांची खरी परीक्षा सुरु होते ती प्रसूती रजा संपल्यावर. कारण प्रसूती राजा संपल्यावर पुन्हा कामावर रुजू होताना तिला अनेक पातळ्यांवरती वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. काहीवेळा तर मानसिक, शारीरिक अशा दोन्ही गोष्टींमुळे ती संपूर्णपणे थकून जाते. खरंतर बाळाला घरी ठेवून पुन्हा कामासाठी घराबाहेर जाणे हाच मोठा टास्क असतो. यासोबतच, नोकरीच्या ठिकाणी देखील तिला अनेक लहान - मोठ्या गोष्टींना तोंड द्यावे लागते.
सतत धडपडून मुलांची ढोपरं-कोपरं काळी पडली? ३ उपाय, मुलांच्या त्वचेची 'अशी' घ्या काळजी...
स्तनपान करणाऱ्या आईने अल्कोहोल प्यावे का? राधिका आपटेचा फोटो पाहून पडलेला व्हायरल प्रश्न...
shethepeopletv यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये, Aon's Voice of Women Study यांनी केलेल्या एक अभ्यासानुसार, प्रसुती रजेनंतर अनेक महिलांना पुन्हा कामावर रुजू होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे दर्शविले आहे. त्यांनी एकूण ५६० कंपन्यांमधील २४००० प्रसूती रजेनंतर पुन्हा कामावर रुजू झालेल्या महिलांचा सर्व्हे केला. यात महिलांना प्रसूती नंतर कामावर पुन्हा रुजू होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे सिद्ध झाले आहे. साधारणतः ७५ % महिला आपले करिअर करण्यात मागे पडतात तर ४० % महिलांना वेतन कपात यांसारख्या समस्यांना तोंड देत काम करावे लागते. यामुळे प्रसूती रजेनंतर आपले करिअर मागे पडत असल्याची भावना अनेकजणींच्या मनात येते.
प्रसूती रजेनंतर पुन्हा कामावर रुजू होताना येतात अडचणी...
अनेकदा प्रसूती रजेनंतर पुन्हा कामावर रुजू होताना काही महिलांना स्वतःला हरवून गेल्यासारखे वाटते. अनेकदा ऑफिसमध्ये हवी तशी वागणूक मिळत नाही. पदोन्नती नाकारली जाते. एवढचं नाही तर अनेकींना मिळत होता त्यापेक्षा कमी पगारात नाईलाजास्तव काम करावे लागते. त्याचबरोबर, काही महिला पूर्णपणे सक्षमतेने आधीसारखे काम करु शकत नाही यासाठी त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाते. अशा एक ना अनेक कारणांमुळे काहीवेळा तिच्या करिअरला कायमचा पूर्णविराम लागतो.