Lokmat Sakhi >Parenting > ४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : आलिया भट मेट गालासाठी सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून गेली, ती सांगते प्रत्येक आईच्या वाट्याला येणारी घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 01:36 PM2023-05-09T13:36:11+5:302023-05-09T13:42:07+5:30

Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : आलिया भट मेट गालासाठी सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून गेली, ती सांगते प्रत्येक आईच्या वाट्याला येणारी घालमेल

Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : 4 days away from Daughter, life was breaking down.. Aaliya says, the struggle of leaving Daughter and working | ४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

मूल झालं की आईचं सगळं विश्वच बदलून जातं, २४ तास सगळ्या गोष्टी या नव्याने आलेल्या जीवाभोवती फिरत राहतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचंही अगदी तसंच झालं. अभिनेत्री असली तरी तिलाही तिचं बाळ तितकंच प्रिय आहे जितकं ते प्रत्येक आईला असतं. तिची मुलगी राहा नुकतीच ६ महिन्यांची झाली आणि आलियाचा मेट गालाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जावे लागले. एकीकडे जगभरातलं ग्लॅमर तिच्या पायावर लोटांगण घालत होतं दुसरीकडे तिचा जीव आपण सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून आलो म्हणूनही तुटत होता. आलिया सांगते, एक दिवसभर आता सहा महिन्याची झाल्यावर मी तिला एकटीला घरी ठेवून कामाला गेले होते, पण चार दिवस? ते ही परदेशी? फार जीव तुटत होता. मॉम्स गिल्ट नाही म्हंटलं तरी मनात येतोच.. पण काम तर करायला हवं.. जीव अर्धा अर्धा होतंच होता माझा (Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood)..’

(Image : Google)
(Image : Google)

कुणाही नोकरी व्यवसाय करणाऱ्या नव्या आईला हा अनुभव येतोच. बाळ सहा महिन्याचं होईतो रजा असते मग ऑफिस सुरु असतं. घरी अंगावर पिणारं बाळ असतं, पान्हा दाटून येतो, जीव तुटतो. बाळ आपल्याशिवाय कसं राहील अशी भीती वाटते. आपला स्वत:चाही राग येतो पण काम तर करावंच लागतं. मेट गालाच्या सोहळ्यासाठी गेलेल्या आलियालाही राहापासून ४ दिवस वेगळं राहावं लागलं. याची सल आलियाने वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. पहिल्यांदाच राहाला सोडून ४ दिवस राहतेय असं सांगत आलिया म्हणाली, ‘काही सेकंदांसाठी मी तिला व्हिडिओ कॉलवर भेटते. तिला पाहिलं की बरं वाटतं. आई झाल्यावर तुम्हाला बाळाला सोडून कोणती गोष्ट करत असताना एकप्रकारचा गिल्ट येतो. मी बाळ आणि काम या दोन्हीला योग्य न्याय देऊ शकेल ना, जमेल ना अशी धास्ती असते. पण बायकांना हे दोन्ही सांभाळावे लागते’.
 

जवळपास ६ महिने कामातून ब्रेक घेतल्यानंतर आता आलिया वेगवेगळ्या फॅशन शो मध्ये किंवा कार्यक्रमांत दिसायला लागली. बाळंतपणानंतर करिअरमध्ये ब्रेक झाला तरी तुमची ओळख कायम ठेवायची असेल तर तुम्हाला नव्या जोमाने पुन्हा करिअर सुरु करावंच लागतं. बाळ झाल्यानंतर साधारण २ महिन्यातच आलिया आपल्याला व्यायाम करताना दिसली होती. बाळंतपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षकांच्या सल्ल्याने ती व्यायाम करत होती. 

मनोंरजन विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'मेट गाला.' या पुरस्कार सोहळ्याला जगभरातील अनेक कलाकार हजेरी लावताना दिसतात. अभिनेत्रींचे रेड कार्पेटवरील कपडे हे या पुरस्कार सोहोळ्याच सर्वात मोठं आकर्षण असत. सेलिब्रिटी आपल्या जबरदस्त फॅशन आणि आऊटफिट्ससह सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. अभिनेत्री आलिया भट्ट यावर्षी पहिल्यांदाच मेट गाला २०२३मध्ये सहभागी झाली आहे. आलिया डिझायनर प्रबल गुरुंग क्रिएशनचा ड्रेस परिधान करून मेट गालाच्या रेड कार्पेटवर अवतरली.

Web Title: Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : 4 days away from Daughter, life was breaking down.. Aaliya says, the struggle of leaving Daughter and working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.