Lokmat Sakhi >Parenting > मुलं अभ्यासाला बसतच नाहीत? ५ गोष्टी करा, अभ्यासाची गोडी लागेल-हुशार होतील मुलं

मुलं अभ्यासाला बसतच नाहीत? ५ गोष्टी करा, अभ्यासाची गोडी लागेल-हुशार होतील मुलं

Most Effective Tips To develop Your Childs Interest In Studies : तुम्ही खेळता खेळता मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:38 PM2024-08-03T20:38:44+5:302024-08-05T17:15:59+5:30

Most Effective Tips To develop Your Childs Interest In Studies : तुम्ही खेळता खेळता मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवू शकता.

Most Effective Tips To develop Your Childs Interest In Studies How To develop Childs Intrest In Studies | मुलं अभ्यासाला बसतच नाहीत? ५ गोष्टी करा, अभ्यासाची गोडी लागेल-हुशार होतील मुलं

मुलं अभ्यासाला बसतच नाहीत? ५ गोष्टी करा, अभ्यासाची गोडी लागेल-हुशार होतील मुलं

अनेक पालकांची तक्रार असते की मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलं पूर्णवेळ खेळत असतात किंवा मोबाईलमध्ये बिझी राहतात. (Parenting Tips) मुलांचे अभ्यासात मन न लागण्याची अनेक कारणं असतात. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. जेणेकरून मुलं मन लावून अभ्यास करतील. (Most Effective Tips To develop Your Childs Interest In Studies) एखादी गोष्ट आवडू लागली की मुलं मनापासून करतात. अभ्यासाची गोडी त्यांना लागली तर ते आपोआप स्वत: हून अभ्यास करतील. जेणेकरून पालकांनाही त्यांचे टेंशन येणार नाही.

1) मुलांसाठी रूटीन सेट करा

मुलं जेव्हा शाळेत जाणं सुरू करतात तेव्हा त्यांच्या पालकांनी एक रूटीन बनवायला हवं. ज्यात त्यांची झोपण्याची वेळ, अभ्यासाची  वेळ, खेळण्याची वेळ सर्व काही असावं. मुलांना लहानपणापासूनच  चांगल्या सवयी लावल्या तर त्याच रूटीमध्ये मुलं रमतील.

पोट खूप सुटलंय-डाएट करणं जमत नाही? रामदेव बाबा सांगतात ३ सोपे उपाय; घटेल वजन

2) पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा

मुलांसाठी पालकांनी स्वत: वेळ द्यायला हवा. आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक  स्वत: खूप बिझी असतात. म्हणूनच पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. मुलं शाळा आणि ट्यूशनच्या अभ्यासाव्यतिरिक्त पालकांनी स्वत: शिकवायला हवं.  पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढायला हवा.

3) मुलांवर अभ्यास करण्यासाठी प्रेशर नको

असं पाहिलं जातं की पालक नेहमी आपल्या मुलांवर प्रेशर बनवतात.  मुलांवर जितकं तुम्ही प्रेशर टाकाल तितकंच ते अभ्यासापासून दूर पळतील. म्हणूनच मुलांनी अभ्यासाचा जास्त ताण घेऊ नये. तुम्ही मुलांना प्रेमाने समजवू शकता.

४) उदाहरणं द्या

अभ्यास करताना मुलांना काही उदाहरणं द्यायला हवीत. ज्यामुळे मुलं व्यवस्थित समजतील आणि त्यांना सर्व काही लक्षात राहील. उदाहरण देऊन तुम्ही मुलांना शिकवू शकता.

शरीर पोखरुन टाकते व्हिटामिन बी-१२ ची कमतरता, ४ व्हेज पदार्थ खा-शरीर होईल मजबूत

५) गेम्स आणि नवीन टेक्निकचा आधार घ्या

मुलांना अभ्यास शिकवण्यासाठी तुम्ही गेम्सचा आधार घेऊ शकता. मुलांना खेळता खेळता साइंस, गणित हे विषय शिकवा. तुम्ही खेळता खेळता मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवू शकता. हा उपाय खूपच परिणामकराक आहे. 

Web Title: Most Effective Tips To develop Your Childs Interest In Studies How To develop Childs Intrest In Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.