रिलेशनशिपबाबत असं म्हटलं जातं की मुली या वडिलांच्या लाडक्या असतात आणि मुलं ही आईची लाडकी असतात. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्याच्या पसंत आणि विचार व्यक्त करू लागतात. अनेकदा आई वडील आणि मुलांमध्ये वैचारीक भेद असतात. ज्यामुळे जुनी पिढी आणि नवीन पिढी मॉडर्न पिढीचे विचार आपसात जुळत नाहीत.(Sadhgutu Told The Real Reason Behind The Fight Between Father And Son)
ज्यामुळे वडील आणि मुलांच्या नात्यात सतत वाद होत असतात. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी मोटिव्हेशनल स्पिकर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी अशा स्थितीत काय करावे, काय करू नये याबाबत काही उपाय सांगितले आहेत. (Motivational Speaker Sadhguru Explains Why Sons And Fathers Fight)
वडील मुलांच्या नात्याबद्दल सद्गुरू काय सांगतात?
अलिकडेच एका शोव्ह दरम्यान बॉलिवूनड डायरेक्टर आणि प्रोड्यूसर करण जोहर यांनी सद्गुरूंना विचारले की एका विशिष्ट वयानंतर मुलं आणि वडीलांमध्ये ताण-तणाव का वाढतो या दोघांमधील दुराव्याचे कारण काय असते. यावर सद्गगुरूंनी सांगितले की, एकाच घरात २ माणसं राहतात तेव्हा त्याच्यात मदभेद होणं स्वाभाविक आहे. ही गोष्टी स्विकार करायला हवी. इतकंच नाही तर सद्गुरूंनी सांगितले की ज्या २ लोकांच्यामध्ये भांडणं होतं ती एकच महिला एकाची पत्नी आणि दुसऱ्याची आई आहे. दोघांमध्ये हे होणं स्वाभाविक आहे.
वडील हे देवाप्रमाणे असतात
सद्गुरू आपले विचार व्यक्त करताना सांगतात की जेव्हा मुलं ९ ते १० वर्षांची होतात तेव्हा त्यांच्यासाठी त्याचे वडील हे कोणत्याही देवापेक्षा कमी नसतात कारण ते आपल्या मुलांची प्रत्येक गरज पूर्ण करत असतात. जेव्हा मुलं १५ ते १६ वर्षांची होतात तेव्हा प्रोब्लेम व्हायला सुरूवात होते. म्हणून या वयातील लोकांचे आपले विचार आणि लाईफस्टाईल वेगवेगळे असते. दुसरे विचार स्वीकार करणं कठीण असतं.
सिच्युएशन कशी हँण्डल कराल
सद्गुरू सांगतात की मुलं मोठी व्हायला लागल्यानंतर घरातील २ व्यक्तींमध्ये मतभेद होऊ लागतात. ही स्थिती टाळण्यासाठी आपापसात अंडरस्टॅण्डींग असणं गरजेचं असतं. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि त्या हिशोबाने इतर निर्णय घ्यावेत.