Join us  

मुलं यशस्वी व्हावीत असं वाटतं असेल तर 'ही' चूक टाळा, संदिप माहेश्वरीचा पालकांना खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 8:29 PM

Sandeep Maheshwari Talk about Biggest Parenting Mistake : मुलांचे पालन पोषण करताना बहुतांश पालक १ चूक करतात ही चूक न केल्यास मुलांचे पालन पोषण चांगले होईल आणि मुलं यशस्वी होतील.

आपल्या मुलांना जगभराती सर्व सुख मिळावं.  मुलांनी आनंदी राहावं असं प्रत्येक आई-वडीलांना वाटतं. मुलांच्या आनंदसाठी काहीही करण्याची आई-वडीलांची तयारी असते.  (Parenting Tips in Marathi) मूल उलट बोलले किंवा त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघाले तर पालकांना वाईट वाटतं. मुलांनी आनंदी राहावं यासाठी पालक त्यांची प्रत्येक डिमांड पूर्ण करतात.

मोटिव्हेशनल स्पिकर (Motivational Speaker) संदिप माहेश्वरी (Sandeep  Maheshwari) यांनी सांगितले की मुलांचे पालन पोषण करताना बहुतांश पालक १ चूक करतात ही चूक न केल्यास मुलांचे पालन पोषण चांगले होईल आणि मुलं यशस्वी होतील.(Sandeep Maheshwari Explain How to Parents Doing Biggest Mistakes)

मुलांना नाही म्हणायला शिका

अलिकडेच व्हायरल झालेल्या मुलाखतीत संदीप माहेश्वरी यांनी  पेरेंटींगबाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत. आई वडील लहानपणापासून मुलांच्या डिमांड्स पूर्ण करत असतात मुलांनी  जे काही मागितले  ते देण्याची पालकांची तयारी असते. संदिप यांच्यामते आई-वडीलांनी असं करणं चुकीचं ठरू शकतं. आई-वडील दोघांनीही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांना मोटिव्हेट करत राहायला हवं पण सगळ्याच बाबतीत त्यांचं म्हणणं ऐकू नये. 

उदाहरण देत आपला म्हणणं मांडलं

एका मुलाखतीत संदीप यांचा अशा मुलीशी परिचय झाला. जी कोचिंग घेऊन युपीएससी परिक्षा देण्याची तयारी करत होती. पण  अनेकदा ट्राय करूनही ती परीक्षा पास होऊ शकत नव्हती. संदीप यांनी तिला सांगितले की,  तू हा अभ्यास कंटिन्यू करू नकोस तू हे करू शकणार नाहीस तेव्हा तिचे वडील म्हणाले तुम्ही तिला डिमोटिव्हेट करू नका. जास्तीत जास्त काय होईल अभ्यासावर  २०-३० लाख खर्च होतील ना.

उद्या ती असं तरी नाही म्हणणार की, ''माझ्या पालकांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही केले नाही. संदीप यांनी सांगितले की, ती मुलगी परिक्षा दिल्यानंतरही युपीएससी क्लिअर करू शकली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली. त्याचं म्हणणं असं म्हणणं होतं की आई वडील काहीवेळा मुलांना योग्य रस्ता दाखवू शकत नाहीत आणि कोणी सजेस्ट करत असेल तर त्यालाही शांत बसायला सांगतात, ज्यात मुलांचे नुकसान होते.

टॅग्स :पालकत्व