हल्ली प्रत्येक शाळांमध्ये दर महिन्याला पॅरेंट्स- टिचर्स मिटिंग म्हणजेच PTM होतात. काही ठिकाणी त्याला पालकसभा असंही म्हणतात. या मिटिंगला गेल्यावर आपल्या पाल्याबद्दल नेमकं काय विचारावं हे पालकांना लक्षात येत नाही. त्यामुळे मग मुलांचं शाळेतलं वागणं कसं आहे ते कळत नाही. किंवा काही पालकांच्या बाबतीत असंही होतं की ते शिक्षकांना मुलांसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न सोडून इतर गोष्टीच जास्त विचारतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांच्या खऱ्या परिस्थितीबाबत आकलन होत नाही. म्हणूनच तुम्ही कधीही मुलांच्या शाळेत PTM साठी गेल्यावर त्यांच्या शिक्षकांना पुढे सांगितलेले काही प्रश्न आवर्जून विचारा (must ask questions to teachers in school Ptm). यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासाबाबत तर माहिती मिळेलच, पण त्यांचं शाळेतलं एकंदरीत वागणं कसं आहे, त्यांचं व्यक्तिमत्त्व कशा पद्धतीने तयार होत आहे, याचीही माहिती तुम्हाला मिळेल. (what to ask to teachers in school ptm?)
मुलांच्या शाळेत PTM ला गेल्यावर शिक्षकांना कोणते प्रश्न विचारावेत?
मुलांच्या शाळेत मिटिंगसाठी गेल्यावर शिक्षकांना मुलांच्या बाबतीत कोणते प्रश्न विचारावे याविषयीची माहिती सांगणारा एक व्हिडिओ maonduty या इन्स्टाग्राम पेजवर पॅरेण्टिंग एक्सपर्टने शेअर केला आहेत. ते प्रश्न नेमके कोणते ते पाहा...
लंचब्रेकनंतर ऑफिसमध्ये खूप सुस्ती येते- कामं सुचत नाहीत? ५ गोष्टी करा- दिवसभर फ्रेश वाटेल
१. शिक्षक शिकवत असताना माझे पाल्य त्याकडे व्यवस्थित लक्ष देतं का, वर्गात होणाऱ्या चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो का?
२. मुल कोणत्या विषयांमध्ये उत्तम आहे आणि कोणत्या विषयांत त्याला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे?
३. माझे मूल शाळेतल्या इतर मुलांसोबत कसे वागते, सगळ्यांसोबत मिक्स होते का?
४. शाळेत होणाऱ्या उपक्रमांमध्ये मुलांचा इंटरेस्ट कसा असताे?
५. मुलाला त्याच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित सांभाळता येतात का?
गचका, आसट झालेला नारळीभात आवडत नाही? ४ टिप्स बघा, भात होईल एकदम मोकळा- चवदार
६. अभ्यासात मुलाची प्रगती व्हावी म्हणून एक पालक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे?
७. माझ्या मुलांना खरोखरच ट्यूशन लावण्याची गरज आहे का?
८. माझ्या मुलांच्याबाबत अशा कोणत्या गोष्टी आहेत का ज्या एक पालक म्हणून मी जाणून घेणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं?