Join us  

मुलांना उत्तम व्यक्ती म्हणून घडवायचं तर टिनएजर्स होण्यापुर्वी त्यांना 'या' ३ गोष्टी शिकवाच... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2024 5:22 PM

Parenting Tips: टीनएजपुर्वी मुलांना काही गोष्टी पालकांनी शिकवणं खूप गरजेचं आहे. (teenage kids)

ठळक मुद्देकाही गोष्टी मुलांना अगदी लहानपणापासूनच शिकवणं आणि टिनएजर्स होईपर्यंत त्यांच्या त्या अंगवळणी पाडणं गरजेचं आहे.

मुलं अजून लहान आहेत, असं म्हणून पालक त्यांना बऱ्याच गोष्टीत गृहित धरत नाहीत. केलं तर केलं नाहीतरी  नाही केलं, असा बहुसंख्य पालकांचा विचार असतो. त्यामुळे नेमकं होतं काय की मुलं खूप आल्हादपणे वाढतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगण्याचं, शिकवण्याचं राहूनच जातं. मग नंतर हीच मुलं जेव्हा टिनएजर्स होतात, तेव्हा मग त्यांची वागणूक पाहून पालकांची चिडचिड होते. मुलांना रागावणं सुरू होतं. म्हणूनच काही गोष्टी मुलांना अगदी लहानपणापासूनच शिकवणं आणि टिनएजर्स होईपर्यंत त्यांच्या त्या अंगवळणी पाडणं गरजेचं आहे. यामुळे तुमचे पाल्य भविष्यातली एक उत्तम व्यक्ती म्हणून घडण्यास नक्कीच मदत होईल. मुलं गुणी- संस्कारी होतील. (Must teach 3 important things to your kids before they enter in teenage)

टिनएजर्स होण्यापुर्वी मुलांना कोणत्या ३ गोष्टी शिकवाव्या?

 

टिनएजर्स होण्यापुर्वी प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना कोणत्या ३ गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, याविषयीचा एक व्हिडिओ gagandeeppahwa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

१. आभार मानायला शिकवा

हल्लीच्या मुलांना सगळ्या गोष्टी खूप चटकन मिळतात. त्यांनी काही मागण्याचाच अवकाश असतो की पालक त्यांच्यासमोर ती गोष्ट हजर करतात. त्यामुळे मुलांना सगळं सोयीचं वाटतं.

जामनगरची स्पेशालिटी असणारे ५ पदार्थ! बघा अनंत- राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना त्याची मेजवानी मिळणार का?

म्हणजेच मुलांना त्या गोष्टींची आणि त्या देणाऱ्यांची किंमत वाटत नाही. हा ॲटीट्यूड त्यांच्यासाठी धोकादायक ठरणारा आहे. त्यामुळे मुलांना त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी पालकांचे, देवाचे आभार मानायला शिकवा. थँक यू म्हणायला शिकवा. 

 

२. मुलांना व्यायामाचं, खेळाचं महत्त्व शिकवा

तब्येत चांगली ठेवायची तर मुलांच्या शारिरीक हालचाली पुरेशा प्रमाणात झाल्याच पाहिजेत. त्यामुळे त्यांना अगदी लहानपणापासूनच एखाद्या खेळाची, व्यायामाची आवड लावा. जेणेकरून त्यांची तब्येत चांगली राहील. 

Anant- Radhika Wedding: ईशा अंबानीने घातला होता सुंदर थ्रीडी गाऊन- बघा काय त्याची खासियत 

३. स्वत:ची कामं करायला शिकवा

काही पालक आणि विशेषत: आई मुलांना सगळं काही जागेवर आणून देतात. मुलांच्या सगळ्या गोष्टी आपणच कराव्या म्हणजे त्या परफेक्ट होतील, असा त्यांचा अट्टाहास असतो. पण असं करणं म्हणजे मुलांना आळशी बनवणं आहे. तुम्ही मुलांना त्यांची कामं करू द्या. सुरुवातीला ती परफेक्ट होणारच नाहीत. उलट त्यात खूप चुका असतील. पण त्यातूनच मुलं शिकतील. काही बाबतीत तरी स्वावलंबी होतील. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं