मुलांना भरवणं हा खूपच कठीण टास्क असतो. कारण मुलं जेवण पटकन खायला मागत नाहीत. त्यांना खूप प्रयत्न करून भरवावं लागतं तेव्हा कुठे खातात. (Parenting Tips) त्यात मुलं आजारी पडली की खायला वेगवेगळं करावं लागतं इतकंच नाही तर मुलं खावीत यासाठी बरेच प्रयत्नही करावे लागतात. मुलांना भरवण्यात बराचवेळ जातो. (The Most Common Reasons Your Baby Refuses To Eat) मुलं स्लो खातात अशी अनेकांची तक्रार असते. मुलांना पटापट खावं यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू शकता. (My Child Is Not Eating Anything What Should I Do)
मुलांना भूक का लागत नाही ते समजून घ्या
मुलांना जेवणाच्या आधी काहीतरी गोड खाल्लं असेल तर त्यांची भूक कमी होते. याव्यतिरिक्त स्नॅक्स खाल्ल्यामुळे व्यवस्थित अन्न पचत नाही. व्यायाम न केल्यामुळेही भूक कमी होते आणि मुलं हळू हळू खाऊ लागतात. म्हणून मुलांना जेवणाच्या २ तास आधी काही गोड पदार्थ खायला देऊ नका.
जेवणात काय आवडतं ते समजून घ्या
मुलांना आपल्या प्लेटमधील जेवणाचा टेक्स्चर, रंग, चव आवडली नाही तर खूपच स्लो खातात की खाल्लेलं अन्न बाहेर काढतात. ज्यामुळे त्यांची भूक कमी होते. त्यांच्या आवडीचे जेवण बनवून द्या.
सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!
मुलं आजारी असतील तर खात नाहीत
मुलं आजारी असतील त्यांना सर्दी, खोकला झाला असेल तर त्यांची भूक कमी होते अशावेळी ते हळूहळू खातात. मुलांना भरवताना त्यांना कफ झाला नाहीये हे तपासा. मुलं आजारी असतील तर त्यांना आवडीचे बनवून द्या.
ना बेसन, ना तांदूळ; १ कप पोह्यांचा करा जाळीदार, स्पंजी ढोकळा; मार्केटसारखा सॉफ्ट बनेल ढोकळा
जेवणाकडे लक्ष असेल असं पाहा
जपानच्या एका वेबसाईटनुसार लहान मुलं फक्त १० मिनिटं एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेंट करू शकतात. जितका जास्तवेळ त्यांना भरवाल तितका जास्त वेळ त्यांना लागेल आणि मुलांना खायला उशीर होईल.
काही मुलांमध्ये माय पेस पर्सनॅलिटीवाली लक्षणं असतात. जे प्रत्येक काम आपल्या पद्धतीने करणं पसंत करतात. अशी मुलं खातात पण खूप कमी वेगाने.