Lokmat Sakhi >Parenting > मुलांना भविष्यात यशस्वी झालेलं पाहायचं तर ८ चुका टाळा; नारायण मूर्तींचा पालकांना खास सल्ला

मुलांना भविष्यात यशस्वी झालेलं पाहायचं तर ८ चुका टाळा; नारायण मूर्तींचा पालकांना खास सल्ला

Narayana Murthy Parenting Tips : पालकांनी रोजच्या  जगण्यात कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत नारायण मूर्ती काय सांगतात ते पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:14 PM2024-09-25T14:14:49+5:302024-09-25T14:16:31+5:30

Narayana Murthy Parenting Tips : पालकांनी रोजच्या  जगण्यात कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत नारायण मूर्ती काय सांगतात ते पाहू

Narayana Murthy Parenting Tips : 8 Mistakes Every Parents Should Avoid As Per Muthy | मुलांना भविष्यात यशस्वी झालेलं पाहायचं तर ८ चुका टाळा; नारायण मूर्तींचा पालकांना खास सल्ला

मुलांना भविष्यात यशस्वी झालेलं पाहायचं तर ८ चुका टाळा; नारायण मूर्तींचा पालकांना खास सल्ला

पालकत्व (Parenting) हा एक सुंदर अनुभव असतो पण याचे रूपांतर आव्हानामध्ये होते. कारण चांगली मुलं घडवणं वाटतं तितकं सोपं नव्हे. पालकांच्या जबाबदाऱ्यांबाबत नारायण मूर्ती यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. पालकांच्या काही चुकांमुळे मुलांचे वर्तन बिघडते. पालकांनी रोजच्या  जगण्यात कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत नारायण मूर्ती काय सांगतात ते पाहू (Narayana Murthy's special advice to parents)

1) फक्त शालेय शिक्षणाकडेच लक्ष देणं

अनेक पालक मुलांनी चांगले मार्क्स मिळवावे, पहिला क्रमांक मिळवावा यासाठी प्रयत्नरत असतात. पण पालकांनी फक्त मुलांच्या शालेय शिक्षणाच्या प्रगतीकडे लक्ष न देता मुलांचे इतर छंद आणि सर्वांगीण विकासाकडेही लक्ष द्यावं.

2) समाजात मिळून-मिसळून राहण्यासाठी प्रोत्साहन द्या

मुलांना समाजातील लोकांचा आदर करणं, मिळून मिसळून राहणं, सामाजिक एक्टिव्हीजमध्ये सहभाग घेणं शिकवायला हवं. आपल्या ओळखीच्या आणि अनोळखी अशा सर्व लोकांचा आदर करायला शिकवा. 

3) मुलांच्या बाबतीत ओव्हप्रोटिव्हीव्ह असणं 

आईवडीलांनी मुलांच्या भविष्याबद्दल जास्त चिंतेत असू नये. मुलांचे पास होणं जितकं म्हत्वाचं असतं तसंच मुलांचे अपयशही महत्वाचे असते. अपयशातून मुलं अनेक गोष्टी शिकत असतात.

4) मुलांना जबाबदारी न शिकवणं

मुलांना जबाबदारीची जाणीव असणं फार महत्वाचे आहे. मुलांनी एखादी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील. याचे भान त्यांना  असावं.  भारतीय घरांमध्ये अनेकदा मुलांना लाडवून ठेवलं जातं आणि वाढत्या वयातही मुलं निष्काळजी वागतात हे टाळायला हवं. 

5) मुलांना सर्व प्रकारची कामं यायला हवीत

नारायण मूर्ती सांगतात की कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं हे मुलांना समजायला हवे. मुलांना लहानपणापासूनच लहान मोठी कामं करायची सवय लावायला हवी.

6) पालकांच मुलांसाठी उत्तम उदाहरण असतात

तरूण मुलं निरिक्षणातून जास्त शिकतात. पालकांनी एकमेंकांचा आदर केला, एकमेकांशी साधेपणाने बोलले तर मुलं सुद्धा तसंच वागतील.

ऐन तारुण्यात नजर धुसर-चष्मा लागला? तुपात ‘हा’ पदार्थ कालवून खा, डोळे सांभाळा..

7) मुलांची कामं मुलांना करू द्या

मुलांना जेव्हापासून कळायला  लागते तेव्हापासून त्यांची कामं त्यांन करू द्या. काही पालक स्पून फिडींग करतात आणि मुलांची सर्व कामं करतात. असं केल्यानं मुलं आळशी होतात मुलांना त्यांची काम व्यवस्थित करू द्या. 

केस खूप तुटतात-टक्कल दिसतंय? जास्वंदाच्या फुलांत हा पदार्थ घालून बनवा हेअर मास्क, झुपकेदार-दाट होतील केस

8) मुलांना माणूसकी शिकवा

नारायण मूर्तींनी माणूसकीचे महत्व सांगितले आहे.  आई वडीलांच्या वागण्यात माणूसकी असेल तर मुलांच्या वागण्यातही असते. म्हणूनच मुलांना कितीही मोठी व्यक्ती झाली तरी इतरांशी आदरानं, प्रेमाने बोलायला शिकवा. 

Web Title: Narayana Murthy Parenting Tips : 8 Mistakes Every Parents Should Avoid As Per Muthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.