Join us

आईबाबांनो, 'या' ५ गोष्टी करण्यासाठी मुलांना बळजबरी करुच नका, तुमचा हट्ट करतो त्यांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 16:12 IST

Parenting Tips: मुलांनी मोठ्या माणसांचं ऐकावं हे कितीही खरं असलं तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या करण्यासाठी पालकांनी मुलांना अजिबात आग्रह करू नये.(never force your kids for doing 5 things)

ठळक मुद्देकाही गोष्टी अशाही आहेत ज्या पुर्णपणे मुलांच्या मनानुसार होऊ द्या. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या बघुया..

काळानुसार जसा प्रत्येक गोष्टीत बदल होत चाललेला आहे तसाच बदल आता पालकत्वामध्येही होत आहे. साधारण १५ -२० वर्षांपूर्वी किंवा त्या आधीच्या काळात पालकांची जी भुमिका होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. पुर्वीप्रमाणे मुलांशी आता अगदी कडक शिस्तीत वागून, त्यांना धाकात ठेवून जमत नाही. तसेच मुलांना काही बाबतीत आग्रह करूनही चालत नाही. पण बऱ्याचदा पालक इथेच चुकतात आणि मग मुलं ऐकत नाहीत म्हणून वैतागतात. त्यामुळे काही गोष्टींमध्ये मुलांना तुमचं जरूर ऐकायला लावा. किंबहुना पालक म्हणून मुलांनी तुमचं ऐकलंच पाहिजे (never force your kids for doing 5 things). पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या पुर्णपणे मुलांच्या मनानुसार होऊ द्या. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या बघुया..(5 common things parents should never force their kids to do)

 

पालकांनी मुलांना 'या' बाबतीत अजिबात आग्रह करू नये 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना एखाद्या नातेवाईकाकडे, मित्रमंडळींकडे जायला अजिबात आवडत नसेल तर तिथे जाण्यासाठी त्याला किंवा तिला अजिबात आग्रह करू नका. त्याला किंवा तिला अमूक एका व्यक्तीकडे जायला का आवडत नाही हे त्याला विश्वासात घेऊन अतिशय शांतपणे विचारा, त्यामागचं खरं कारण जाणून घ्या.

तासनतास व्यायामाची गरजच नाही, फक्त १ मिनिटासाठी ताडासन करा आणि ५ फायदे मिळवा

२, मुलांना एखाद्या क्लासला बळजबरीने पाठवू नका. कारण तुम्ही पाठवूनही मुलांचं मन तिथे लागत नसेल तर याचा अर्थ असा आहे की मुलांना त्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्याउलट त्यांचे आवडीचे विषय, छंद शोधा आणि त्यानुसार त्यांना योग्य  शिकवणी किंवा क्लास लावा. 

३. मुलांना तुमच्या आवडीच्या मुलामुलींशी मैत्री करण्याचा आग्रह करू नका. त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना स्वतःला ठरवू द्या. 

 

४. मुलांना कधी खायला द्यावं याविषयी अनेक पालकांना खूप संभ्रम असतो. भिंतीवरचं घड्याळ मुलांच्या भुकेच्या बाबतीत लागू करू नका. घड्याळात अमूक वाजले म्हणजे आता खायलाच पाहिजे, असं मुलांच्या बाबतीत करू नका. ते जोपर्यंत खायला मागत नाही तोपर्यंत आग्रह करून त्यांना बळजबरीने खाऊ घालू नका. 

स्क्रिन पाहून डोळे होत आहेत खराब, मुलांना लागतोय चष्मा! 'हे' पदार्थ खा- नजर राहील तेज

५. शेअरिंग इज केअरिंग हे मुलांना जरूर शिकवा. पण अशा काही गोष्टी असतात ज्या मुलांना इतरांसोबत शेअर करायला अजिबात आवडत नाही. नेमक्या त्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कर असं म्हणत त्यांच्या मागे लागू नका.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं