Lokmat Sakhi >Parenting > पाठांतर करूनही पेपर लिहीताना काहीच आठवत नाही? रिव्हीजनची १ ट्रिक वापरा, कधीच विसरणार नाही

पाठांतर करूनही पेपर लिहीताना काहीच आठवत नाही? रिव्हीजनची १ ट्रिक वापरा, कधीच विसरणार नाही

Ninja Technique Of Revision : रिव्हजन करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की तुमचा तो विषय पक्का होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 02:03 PM2024-09-15T14:03:49+5:302024-09-15T14:16:55+5:30

Ninja Technique Of Revision : रिव्हजन करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की तुमचा तो विषय पक्का होतो.

Ninja Technique Of Revision How To Revise With 100 Percentage Concentration | पाठांतर करूनही पेपर लिहीताना काहीच आठवत नाही? रिव्हीजनची १ ट्रिक वापरा, कधीच विसरणार नाही

पाठांतर करूनही पेपर लिहीताना काहीच आठवत नाही? रिव्हीजनची १ ट्रिक वापरा, कधीच विसरणार नाही

परिक्षेचा कालावधी जसजसा जवळ येतो तसं मुलांच्या मनात भिती तयार होऊ लागते. (Ninja Technique Of Revision) नापास होण्याची भिती लोकांमध्ये असते. मुलं अभ्यास करायला बसतात तेव्हाही त्यांच्या मनात भिती असते. या भितीपासून सुटका मिळवण्याची योग्य पद्धत अशी की केलेल्या अभ्यासाची सतत रिव्हीजन करायला हवी. परिक्षेच्या दिवसांत रिव्हीजन करणं उत्तम ठरते. परिक्षेत लिहणं कठीण होतं. रिव्हीजन  करण्याचा अर्थ असा नाही की फक्त पानं उलटत राहावं यासाठी रिव्हीजन करण्याचे इतर अनेक फायदे आहेत. (Ninja Technique Of Revision How To Revise With 100 Percentage Concentration)

रिव्हीजन करण्याची योग्य पद्धत कोणती

रिव्हीजन करण्याच्या सुरूवातीला रिव्हीजनची वेळ आणि सिलॅबस पॅटर्न तयार करा.  फक्त नोट्सवर अवलंबून राहू नका. जुने पेपर्स काढून वाचा.  ज्यामुळे विषय समजून घेणं सोपं होईल. शाळा किंवा कोचिंग  क्लासमध्ये तुम्ही जे काही वाचता किंवा लिहिता ते रिव्हीजन करा आणि त्यासाठी योग्य वेळ द्या.  यामुळे तुमचे वाचण्याचे तास वाढतील आणि तुम्ही जे काही वाचाल ते आयुष्यभर विसरू शकणार नाही.

रिव्हिजन कशी कराल?

पहिल्या दिवशी  २ ते ४ तासांचा क्लास अटेंड केला असेल तर घरी जाऊन त्याच विषयाची रिव्हीजन करा. ज्यात तुम्हाला ३० मिनिटांचा कालावधी लागेल ज्यामुळे विषय समजण्यास मदत होईल.

दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही २ ते ४ तासांचा क्लास अटेंड कराल तेव्हा घरी जाऊन ४५ मिनिटं रिव्हीजन करा.
तिसऱ्या दिवशीसुद्धा इतकेच तास अभ्यास करा.  असं करत करत  एका आठवड्यात तुम्हाला वाचलेलं सर्व काही लक्षात राहील. कधीच रट्टा मारू नका नेहमी विषयाचे बेसिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. 


रिव्हीजन करण्याचे फायदे

रिव्हजन करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की तुमचा तो विषय पक्का होतो.  त्या विषयाशी निगडीत इतर  धडे ही चांगले लक्षात राहतात. अनेकदा सोप्या प्रश्नांची रिव्हीजन न  केल्यामुळे  मार्क्स कमी होतात. म्हणून सोपे प्रश्न असतील तरी त्याची रिव्हीजन करत राहा.

Web Title: Ninja Technique Of Revision How To Revise With 100 Percentage Concentration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.