Join us  

मुलांच्या तब्येतीची चिंता सतावते? चांगल्या आरोग्यासाठी मुलांसाठी वाढीच्या निरीक्षण महत्त्वाचं, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 8:30 AM

Observation Of Child Development : वाढीचे निरीक्षण बालरोगतजज्ज्ञांच्या कार्यालयात केले जाते. केवळ आजारपणातच नव्हे तर दैनंदिन आरोग्यासाठीही बालरोगतजज्ज्ञांना भेट देणे महत्त्वाचे आहे.

मुलांच्या वाढीच्या निरीक्षणामध्ये मुलाने साध्य केलेल्या काही महत्त्वाचे मोजमाप आणि टप्प्यांचा पाठपुरावा करणे यांचा समावेश केलेला असतो. यामध्ये ठराविक आणि नियमित अंतराने या मापदंडांचे मोजमाप घेणे आणि त्यांना वाढीच्या तक्त्यावर नमूद करणे यांचा समावेश आहे. या मोजमापांमध्ये  प्रामुख्याने वजन, लांबी/उंची आणि डोक्याचा घेर यांचा समावेश होतो. हे सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित  वाढीच्या तक्त्यावर खूण निर्देश केली जाते की मूल अपेक्षित वाढीच्या मार्गाचे अनुसरण करत आहे, ज्याला योग्यरित्या 'रोड टू हेल्थ' म्हटले जाते. (The Importance of Observation Child in Early Childhood)

अशा प्रत्येक भेटीत, मुलाच्या विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे देखील तपासले जातात. प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याच्या वाढीचा एक विशिष्ट मार्ग असतो. त्यामुळे एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करण्याऐवजी, मुलाची तुलना त्याच्या स्वत:च्या आधीच्या मापदंडानुसार केली जाते आणि त्याचा अर्थ लावला जातो.  डॉ. वैदेही दंडे (बाल विशेषज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ, सिम्बायोसिस हॉस्पिटल, मुंबई) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Observation Of Child Development)

वाढीचे निरीक्षण कधी केले जाते? 

वाढीचे निरीक्षण हे पहिल्या 2 वर्षांमध्ये जास्त वेळा केले जाते कारण याच काळात शारीरिक आणि बौद्धिक वाढ जलदगतीने होते. पहिल्या वर्षी, पहिल्या 3 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला करणे आवश्यक आहे (सामान्यत: लसीकरण वेळेसह) नंतर दर 3 महिन्यांनी असे मुल एक वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि त्यांनतर नंतर 5 वर्षांपर्यंत दर 6 महिन्यांनी आणि नंतर  मूल 12 वर्षांचे होईपर्यंत दरवर्षी.

प्रत्येक भेटीच्या वेळी, महत्त्वपूर्ण मापदंड मोजले जातात आणि विकासात्मक टप्पे तपासले जातात.  यामध्ये डोक्याच्या घेराचा येथे विशेष उल्लेख करावा लागेल. मेंदूची वाढ (आकारमानाप्रमाणे) वयाच्या ७ वर्षांपर्यंत जवळजवळ पूर्ण होते. डोके मोजणे हे मेंदूच्या वाढीची अप्रत्यक्ष खूण आहे आणि त्यात खूप मंद   (धिम्या गतीने) किंवा खूप जलदगतीने  वाढ होणे हे असामान्य लक्षण आहे. 

मुलाचे आरोग्य सुधारण्यासाठी वाढीच्या निरीक्षणाची कशाप्रकारे मदत होते? 

उंची आणि वजन अचूक वाढ दर्शवते की मूल चांगले सुदृढ आणि निरोगी आहे. आधी निरोगी असलेल्या मुलामध्ये मापदंडामध्ये काही कमी पडणे हे कुपोषण किंवा काही अंतर्गत  रोग दर्शवू शकते. यामुळे पालकांच्या मनातील त्यांच्या मुलाच्या आरोग्याविषयीची भीती दूर करण्यात देखील मदत होते.

प्रौढत्वामध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीतील आजार होण्याचा धोका देखील हे दर्शविते. वर म्हटल्याप्रमाणे वेळेतच धोका कळून आला की उपचार करून पुढचा संभाव्य धोका टाळू शकतो.  त्याचप्रमाणे डोक्याच्या आकारात अयोग्य वाढ देखील चिंताजनक आहे आणि हे न्यूरोलॉजिकल आणि बौद्धिक समस्यांची सुरुवात किंवा प्रारंभिक खूण असू शकते. 

वाढीचे निरीक्षण कोठे केले जाते?

वाढीचे निरीक्षण बालरोगतजज्ज्ञांच्या कार्यालयात केले जाते. केवळ आजारपणातच नव्हे तर दैनंदिन आरोग्यासाठीही बालरोगतजज्ज्ञांना भेट देणे महत्त्वाचे आहे. तुमचे बालरोगतज्ज्ञ तुम्हाला वाढीच्या मूल्यांकनासाठी पुढील तारखा देतील. अशा प्रकारे तुम्हाला पाहण्यासाठी तुमच्या बालरोगतजज्ज्ञांनी घेतलेली मोजमापे आणि केलेले मूल्यमापन (वाढीसाठीच्या केलेल्या) वाढीच्या तक्त्यावर नोंदवले जाईल. या भेटी चुकवू नये, हे लक्षात असणे गरजेचे आहे. अशा भेटी पौष्टिक कमतरता आणि वर्तणुकीशी संबंधित असलेल्या समस्यांची सूक्ष्म चिन्हे ओळखण्यास देखील मदत करतात जेणेकरुन त्यांना वेळेवर संबोधित करता येईल. 

टॅग्स :पालकत्वआरोग्यबालदिन